मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी केक सिंह यांनी पोलिसांत तक्रार नोंदवल्याच्या दिवसापासून राजपूत कुटुंबाला पाठिंबा देत आहे. यासोबतच प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची ती थेट उत्तर देत आहे. टाइम्स नाउशी बोलताना अंकिताने सुशांतच्या अंत्यसंस्काराला का गेली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. सुशांतचे व्हायरल झालेले फोटो पाहून ती फार अस्वस्थ झाली होती. याचमुळे ती अंत्यसंस्कारांना गेली नाही.

अंकिता म्हणाली की तिला ज्या प्रकारने सुशांतचे फोटो इण्टरनेटवर व्हायरल झाले होते ते पाहून तिला फार त्रास झाला होता. हे फक्त तिच्यासाठीच नाही तर सुशांतच्या कुटुंबियांसाठीही फार दुखद होतं. सुशांतच्या जवळील लोकांना त्याचे हे फोटो पाहून अपार दुःख झालं होतं.

सुशांत आणि अंकिता अनेक वर्ष लिव्ह- इनमध्ये होते. दोघांचं ब्रेकअप झाल्यानंतरही अंकिताचे सुशांतच्या कुटुंबियांसोबतचे चांगले संबंध होते. सुशांतच्या अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय तिचा स्वतःचा होता. कारण तिला माहीत होतं की सुशांतला अशा अवस्थेत पाहणं तिला शक्य होणार नाही.

सुशांतबद्दल बोलताना अंकिताने याआधीही स्पष्ट केलं होतं की, सुशांत आयुष्य मनमुरादपणे जगणारा माणूस होता. तो डिप्रेशनमध्ये कधीच जाऊ शकत नाही. सुशांत डिप्रेशनमध्ये होता अशाच गोष्टी समोर येत असताना अंकिताने स्वतःहून यावर आपलं मत मांडलं. दरम्यान, बिहार पोलिसांनी मुंबईत आपली तपास मोहीम सुरू केली असून अनेक गोष्टींवर त्यांचं बारकाइने लक्ष आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here