नवी दिल्ली : भारताची राजधानी नवी दिल्ली येथून दोहा येथे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचं पाकिस्तानातील कराचीमध्ये इमरजन्सी लँडिंग करावं लागलं आहे. विमानातून प्रवास करणाऱ्या ६० वर्षीय प्रवासी अब्दुल्लाच्या निधनामुळं आप्तकालीन लँडिंग करावं लागलं. मृत अब्दुल्ला नायजेरियाचे नागरिक होते. रविवारी १२ मार्चला त्यांचं निधन झालं. यासंदर्भात इंडिगोकडून माहिती देण्यात आली आहे. आपत्कालीन स्थितीत यापूर्वी देखील भारतीय विमानं पाकिस्तानच्या कराची विमानतळावर उतरवण्यात आलं होतं. कराची विमानतळावर यापूर्वी एकदा स्पाईसजेट आणि इंडिगोच्या विमानाचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी जुलै महिन्यात विमानांचं दोन वेळा इमरजन्सी लँडिंग कराची विमानतळावर करण्यात आलं होतं.

इंडिगो एअरलाइन्सचं विमान फ्लाइट क्रमांक ६ई १७३६ रविवारी रात्री १०.०५ ला दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरुन दोहाच्या दिशेनं निघालं होतं. विमानानं उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच अब्दुल्ला यांची प्रकृती बिघडली. त्यांनी विमानातील स्टाफकडे यासंदर्भात तक्रार केली होती. यानंतर या तक्रारीवरुन विमान कराचीच्या दिशेनं वळवण्यात आलं होतं. विमानाच्या पायलटनं कराची विमानतळावर इमरजन्सी लँडिंगची परवानगी केली होती.

पाकिस्तानच्या हवाई वाहतूक विभागाकडून भारताच्या विमानाला आपत्कालीन विभागाला परवानगी दिली. रात्री १२.०८ वाजता विमानाचं लँडिंग करण्यात आलं. वैद्यकीय तज्ज्ञांनी अब्दुला यांची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केलं. यानंतर अब्दुल्ला यांच्या मृत्यूचं प्रमाणपत्र जारी केलं. इंडिगो एअरलाइन्सनं अधिकृतपणे माहिती देत अब्दुल्ला यांच्या निधनावर शोक व्यक केला आहे.

बाईक थांबवून फोनवर बोलत होते, पण मागून ट्रॅक्टरने उडवून चिरडलं, पुण्यात शिक्षकाचा करुण अंत

भारतीय विमान वाहतूक कंपन्यांची विमानं यापूर्वी देखील पाकिस्तानात उतरवण्यात आलं होतं. १७ जुलै २०२२ ला शारजाह येथून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या आंतरराष्ट्रीय विमानाला तांत्रिक कारणांमुळं पाकिस्तानच्या कराची विमानतळावर उतरवण्यात आलं होतं.

५ जुलै २०२२ रोजी दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं आपत्कालीन लँडिंग कराची विमानतळावर करावी लागली होती.
विराटने पुन्हा काढली नितीन मेनन यांच्यासोबतच्या वादाची खपली; म्हणाला-मला लगेच Out दिलं असतं!

दरम्यान, भारतातील विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये बिघाड झाल्यानं यापूर्वी अनेकदा इमरजन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. त्यामुळं प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील चर्चेत आला होता.

शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या खास माणसाला पोलिसांनी मुंबई विमानळावरुन उचललं

एकनाथ खडसेंऐवजी एकनाथ शिंदेंचा उल्लेख, जयंत पाटलांनी घेतली फिरकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here