नागपूर: लग्न ठरवण्यासाठी घरी पाहुणे आल्यामुळे भीतीपोटी मुलीने कॉलेजमध्ये जाऊन विष प्राशन करत आपलं आयुष्य संपवलं आहे. नागपुरातील धंतोली येथील आनंद टॉकिजजवळ असलेल्या महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वर्गातच या तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. ही २३ वर्षीय तरुणी मानेवाडा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही २३ वर्षीय विद्यार्थिनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होती. ती सोमवारी ६ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता औद्योगिक संस्थेत आली. तिच्या आई-वडिलांनी तिचं लग्न ठरवण्याचा विचार केला होता. परंतु, मुलीला लग्न करायचं नव्हतं. तिला शिक्षण पूर्ण करून नोकरी करायची होती. मात्र, आई-वडील तिच्या लग्नासाठी प्रयत्न करत होते.

सब इन्स्पेक्टरनं स्वत:ला संपवलं, पोलिसांचा घरी फोन, प्रतिसाद नाही; जाऊन पाहिलं तर सारंच संपलेलं
६ मार्चलासुद्धा मुलाकडील पाहुणे घरी आले होते. त्यामुळे आईने फोन करून तिला घरी बोलावले. मात्र, तिने घरी येण्यास नकार दिला आणि आज होळी आहे तरीही आज कशाला बोलावले असे ती आई ला म्हणाली. इतकंच नाही तर तिचं एका तरुणावर प्रेम होतं, तिला त्याच्याशीच लग्न करायचे होते, त्यामुळेच ती लग्नाला नकार देत होती, असे ही सांगन्यात येत आहे.

६ मार्चला तिने वर्गातच कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. अन्य विद्यार्थ्यांनी तिला लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान ११ मार्चला सकाळी साडेअकरा वाजता तिचा मृत्यू झाला. धंतोली पोलीस ठाण्याचे हवालदार क्रिष्णा, उपनिरीक्षक शेख यांनी या प्रकरणात काहीही सांगण्यास नकार दिला. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

चिमुकल्याचं अपहरण, पाच दिवसांनी मृतदेह तलावात, कारण कळताच आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली
पालकांनी मुलांना समजून घ्यावं

लग्न केलं तर आपली स्वप्नं पूर्ण होऊ शकणार नाहीत, असं बहुतेक तरुणांना वाटतं. त्यांना लग्नापेक्षा चांगली नोकरी आणि यश हवे आहे. स्वातंत्र्य संपुष्टात येण्याच्या भीतीमुळे मुले किंवा मुली कोणत्याही बंधनात अडकू इच्छित नाहीत. ते निर्बंध आणि जीवनात कोणत्याही बदलासाठी तयार नाही. अशा परिस्थितीत अनेक पालक आपल्या तरुण मुलाने किंवा मुलीने लग्न न करण्याच्या हट्टामुळे हैराण झाले आहेत. तुमचा तरुण मुलगा किंवा मुलगी त्यांना लग्न का करायचे नाही हे आधी समजून घ्यायला हवे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here