बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधून पडून एका एअर होस्टेसचा मृत्यू झाला. एअर होस्टेस तिच्या प्रियकराच्या घरी गेलेली असताना हा प्रकार घडला. पोलिसांनी हत्येची नोंद करून तपास सुरू केला आहे. प्रियकराला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू आहे. एअर होस्टेसची हत्या तिच्याच प्रियकरानं केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

२८ वर्षीय एअर होस्टेस अर्चना धीमानची ओळख डेटिंग ऍपच्या माध्यमातून सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या आदिशसोबत झाली. सुरुवातीला दोघांची मैत्री झाली. नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मात्र काही दिवसांत दोघांमध्ये वाद होऊ लागले. नात्यात काहीच आलबेल नसल्यानं अर्चना दुबईहून बंगळुरूला आली. आदिशसोबतच नातं संपुष्टात आणण्यासाठी अर्चना मायदेशी परतली होती.
पहाटेच्या सुमारास डेपोतील बस पेटली; कंडक्टरचा होरपळून अंत, सवय जीवावर बेतली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना आदिशच्या बंगळुरूतील फ्लॅटवर गेली होती. तेव्हा चौथ्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला. अर्चनाच्या मृत्यूची माहिती आदिशनं पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी आत्महत्येची नोंद करत तपास सुरू केला. मात्र प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी हत्येची नोंद केली. अर्चना धीमान हिमाचल प्रदेशच्या धर्मशालाची रहिवासी होती. तर आदिश केरळचा रहिवासी आहे. दोघांची ओळख एका डेटिंग ऍपच्या माध्यमातून झाली.
तो हेतू नव्हता, माफी मागते! होळीला गैरवर्तन सहन करणारी जपानी तरुणी भारताबद्दल काय म्हणाली?
दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर अर्चनाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचं आदिशनं पोलिसांना सांगितलं. अर्चना सुरुवातीला बंगळुरूत एअर होस्टेस होती. त्यानंतर ती आंतरराष्ट्रीय कंपनीत रुजू झाली. आदिश आणि अर्चनामध्ये नंतर वाद होऊ लागले. त्यामुळे दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता, असं आग्नेय बंगळुरूचे पोलीस उपायुक्त सी. के. बाबा यांनी सांगितलं. ‘नातं संपुष्टात आणण्यासाठी अर्चना आदिशच्या फ्लॅटवर गेली होती. ज्या जागेवरून अर्चना पडली, तिथून उडी मारणं इतकं सोपं नाही. त्यामुळे आम्ही आदिशला ताब्यात घेतलं आहे. दोघांमध्ये वाद झाल्याचं आदिशनं चौकशीत सांगितलं आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here