पुणे : शिवाजीनगर परिसरात दाम्पत्य चहा पिण्यासाठी निघाले असताना एका कंटेनरने पतीला चिरडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. लाडक्या लेकीचं पोलीस व्हायचं स्वप्न असल्याने भरती प्रक्रियेसाठी माता-पिता तरुणीला पुण्यात घेऊन आले होते. परंतु काळाने वडिलांवर घाला केला.

पुण्यात सध्या पोलीस भरतीची तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने मुलांना प्रोसाहित करायला किंवा सोडायला त्यांचे आई वडीलही सोबत येत आहेत. मात्र नाशिकवरून आलेल्या एका दाम्पत्यातील पतीचा अपघाती मृत्यू झाला.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहे. सुरेश सखाराम गवळी (वय ५५ वर्ष, रा. नाशिक) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश सखाराम गवळी यांची लेक ज्योती गवळी ही पोलीस भरतीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. पोलीस भरतीची तारीख कळल्यानंतर सुरेश गवळी आणि त्यांची पत्नी आपली लेक ज्योती गवळीला नाशिकहून पुण्याला घेऊन आले.

आम्ही परत येणार नाही, आईला मेसेज; मुंबईत प्रेमी युगुलाने आयुष्य संपवलं, मिठी मारलेले मृतदेह
काल रात्री पुण्यामध्ये उतरल्यानंतर त्यांनी पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरातील फुटपाथवर मुक्काम देखील केला. पहाटे दोनच्या सुमारास मुलीची परीक्षा असल्याने मुलीला ग्राउंडवर सोडायला देखील गेले. मुलीला रात्री ग्राउंडवर सोडल्यानंतर शिवाजीनगर परिसरातून हॉटेल प्राईडच्या दिशेने चहा पिण्यासाठी म्हणून सुरेश गवळी निघाले असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने सुरेश गवळी यांना उडवलं आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

विहिरीच्या पाण्याचा वाद जीवावर बेतला, सांगलीत काका-पुतण्याची हत्या
याबाबतचा अधिक तपास आता शिवाजीनगर पोलीस करत अधिक तपास पोलीस करत असून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अर्जुन नाईकवाडे हे तपास अधिकारी म्हणून काम करत आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहनाचा शोध घेतला जात आहे.

शीतल म्हात्रेंचा व्हिडिओ व्हायरल, कल्याणचा तरुण ताब्यात; उद्धव ठाकरे गटाचं पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here