मुंबई : नव्या जीवाला जन्म देण्याचं महिलांना मिळालेलं वरदान खर तर अनेक कारणांमुळे आनंददायी अनुभव असू शकतो. मात्र महिलांनी विशिष्ट वयातच गर्भधारणा करावी, यासारखे समाजात काही अलिखित नियम मानले जातात. प्रख्यात अभिनेता आयुषमान खुराणा याची भूमिका असलेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटातून याच विषयावर भाष्य करण्यात आलं होतं. घरात लग्नाचा मुलगा असताना वयाच्या पन्नाशीनंतर आई गरोदर होते आणि मुलाला तोंड दाखवायला जागा उरत नाही, असं या बॉलिवूडपटाचं कथानक होतं.

‘बधाई हो’ सिनेमात घडलेली कहाणी प्रत्यक्षात घडली आहे. वयाच्या पन्नाशीकडे वाटचाल करणाऱ्या महिलेने पुन्हा लक्ष्मीला जन्म दिला. केरळातील ४७ वर्षीय महिलेने मुलीला जन्म दिला. या महिलेची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून नेटिझन्सनी बाळ बाळंतीणीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

२३ वर्षांच्या आर्याने तिच्या कुटुंबाची गोष्ट सांगितली आहे. ४७ व्या वर्षी आई प्रेग्नंट असल्याचं समजल्यावर ती काहीशी हडबडून गेली. आई-बाबांनाही ही गोष्ट मुलीला कशी सांगावी हे समजत नव्हतं. किंबहुना शरमच वाटत होती. मात्र हळूहळू गोष्टी बदलत गेल्या आणि सगळेच घरात नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी सज्ज झाले.

महिलेच्या घरी रात्रभर मुक्काम, पहाटे खून, बाथरुममध्ये मृतदेह, पोलिसांनी सहा तासात छडा लावला
“मी कसा प्रतिसाद देईन याची खात्री नसल्यामुळे अप्पांनी माझ्यापासून अम्माची प्रेग्नन्सी लपवून ठेवली होती. काही दिवसांनी जेव्हा मी घरी गेले, तेव्हा धावत अम्माकडे गेले आणि रडायला लागले. मला लाज कशाला वाटेल? मला हे कधीपासून हवं होतं” असं आर्या म्हणाली. आईला ती गरोदर असल्याचं समजलं, तेव्हा सातवा महिना सुरु होता.

आम्ही परत येणार नाही, आईला मेसेज; मुंबईत प्रेमी युगुलाने आयुष्य संपवलं, मिठी मारलेले मृतदेह
आर्याची गोष्ट “ह्युमन्स ऑफ बॉम्बे” इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. त्यानंतर अल्पावधीतच तिला ऑनलाईन लोकप्रियता मिळाली. जवळपास पावणे दोन लाख नेटिझन्सनी या पोस्टला लाईक केले आहे. दोन हजाराहून अधिक इन्स्टाग्राम युजर्सनी आर्याच्या आई आणि संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here