कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार हे कुटुंबीयांसह १४ दिवसांसाठी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी त्यांच्या सासर्‍यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी कुटुंबीयांसह होम क्वॉरंटाइन होण्याचा निर्णय घेतला. याशिवाय गेल्या चार दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

खासदार धैर्यशील माने हे दांडगा जनसंपर्क असणारे नेते आहेत. करोना संसर्गाच्या काळात रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी त्यांच्याकडून कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा आणि कार्यकर्त्यांसोबत वारंवार बैठका दौरे सुरू होते. त्यांच्या सासऱ्यांना करोना संसर्गाची लक्षणे जाणवताच स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. शनिवारी सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर खासदार माने यांनी तातडीने स्वतःसह कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही माहिती दिली असून कार्यकर्त्यांनाही करोनाची लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. होम क्वॉरंटाइन झाल्यानंतर माने हे स्वत:ची करोना टेस्ट करणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या चार दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी वैद्यकीय तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. येणाऱ्या १४ दिवसात काही अडचणी निर्माण झाल्यास नागरिकांनी मोबाइलवर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

करोना संसर्गामुळे चार दिवसांपूर्वीच सांगलीत माजी महापौर हारूण शिकलगार यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर काल नगरसेवक संतोष गायकवाड यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात काल करोना संसर्गामुळे सहा जणांचा बळी गेला, तर सांगली जिल्ह्यात १२ जण करोनाचे बळी ठरले आहेत. दिवसेंदिवस करोना बळींची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

Leave a Reply to SMS Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here