नंदूरबार: जिल्ह्यातील शहादा येथून धडगावकडे जाणाऱ्या बस मधील ७९ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना धडगाव तालुक्यातील खामला गावादारम्यान घडली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव हा तालुका दुर्गम भाग असल्याने बराच किलोमीटर प्रवास घाटातून होत असतो. बस आणि खाजगी प्रवाली वाहनं यांना वाहन चालवताना घाटात मोठी कसरत करावी लागते. घाटात बरेच वेळा अपघाताच्या घटना घडत असतात. मात्र, आज चालत्या बसमध्ये वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

अरेरे! रंगपंचमीला मनसोक्त खेळली; मग मैत्रिणींसोबत गप्पा मारताना १६ वर्षीय मुलीचा करुण अंत
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील शहादाहून धडगावकडे जाणाऱ्या बस क्रमांक MH 20 BL 3562 शहादा-धडगाव राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एकूण ६० प्रवाशी प्रवास करत होते. या बसमध्ये सिंगा पाडवी हे ७९ वयोवृद्ध प्रवासी प्रवास करत असताना त्यांचा चालत्या बसमध्ये मृत्यू झाला आहे. दरा गावाहून ते बस मध्ये चढले होते. काही वेळाने बसमध्ये त्यांना अस्वस्थ वाटू लागले. घाटातून जाणाऱ्या बसमध्ये त्यांचा तोल देखील जाऊ लागला होता. त्यांची तब्येत बिघडत असल्याचं बसमधील प्रवाश्यांना लक्षात आले.

त्यानंतर बसमधील प्रवाश्यांनी पुढे बसलेल्या बस वाहक शांताराम दांडगे यांना वयोवृद्ध प्रवाशाच्या तब्येतीबाबत सांगितले. बस वाहक यांनी बसमध्ये मागे येऊन त्यांच्या अंगाला हाथ लावला. त्यावेळी त्यांचं अंग थंड पडलेलं होतं आणि त्यांची जिभही बाहेर आलेली दिसून आली. बस वाहकाने चालकाला तात्काळ बस थेट धडगाव तालुक्यातील मांडवी प्राथमिक उपचार केंद्रावर नेण्यास सांगितलं. तिथे सिंगा पाडवी यांना डॉक्टरांनी तपासले असता त्यांना धडगाव येथे घेऊन जाण्यास सांगितले, तसेच, पोलिसांना माहिती देण्यासही सांगितलं.
सब इन्स्पेक्टरनं स्वत:ला संपवलं, पोलिसांचा घरी फोन, प्रतिसाद नाही; जाऊन पाहिलं तर सारंच संपलेलं
सिंगा पाडवी यांचा चालत्या बसमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला असल्याची चर्चा आहे. सिंगा पाडवी यांचा मृतदेह धडगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनाही याबाबत कळविण्यात आले आहे.

सिंगा पाडवी यांच्या कुटुंबालाही या घटनेबाबत कळविण्यात आलं आहे. मृत सिंगा पाडवी त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्यापही स्पष्ट झालेलं नसल्याची माहिती मिळतेय. याबाबत पोलिसांकडे अजून कोणत्याची प्रकारची नोंद करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here