साईनाथ हा वाघ आहे तो लढत राहील, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड होत राहणार आहे. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की धरपकड होणार, आमच्यावर अन्यायाचे विषय होत राहणार पण आम्ही लढत राहू, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईकडे येत आहे तो विषय दबला आहे. अब्दुल सत्तार शेतकऱ्यांबद्दल जे बोलले आहेत ते दबले आहे, यासाठीच तो विषय काढण्यात आला असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
सुभाष देसाई आमच्यासोबत असून भूषण देसाई यांचा शिवसेनेशी काही संबंध नव्हता. पण, त्यांना वाशिंग मशीनमध्ये उडी मारायची असेल तर जाऊ शकतात, असं आदित्य ठाकरे म्हणाले.सुभाष देसाई हे दररोज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करत असतात. पद, मंत्रिपद नसलं तरी त्यांनी २४ तास पक्षासाठी दिलेले आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही काम करत आहोत.
राज्यातील महत्त्वाचे आणि खरे विषय असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत ते दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.महाराष्ट्र सध्या अंधारात गेलेला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट झाली असेल त्यावेळी करोनाचं संकट असून देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. अन्याय होत असला तरी लढून महाराष्ट्राला सुवर्णकाळ दाखवू असं आदित्य ठाकरे म्हणाले.