सूरत: गुजरातमधील सूरतमध्ये एका २५ वर्षीय तरुणीने आपल्या मामाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मामाने तिच्यासोबत जबरदस्ती ठेवले. त्यानंतर आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून तिच्या वडिलांना पाठवला, असा आरोप तरुणीने केला आहे. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

तरुणीच्या माहितीनुसार, ती सौराष्ट्रमधील रहिवासी आहे. सूरतच्या पूना परिसरात राहते. साड्यांना पीको-फॉल करून उदरनिर्वाह करते. तिचा मामा (वय ३०) तिच्या घरी येत असे. मला मामा म्हणू नकोस असे त्याने सांगितले. एका वर्षापूर्वी त्याने जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर वारंवार लैंगिक शोषण केले. महिनाभरापूर्वी त्याने आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ चित्रीत केला, असे तरुणीने सांगितले.

लग्नानंतरही संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला

तरुणीच्या तक्रारीनुसार, तीन महिन्यांनी तिचे घरच्यांनी दुसऱ्या एका मुलाशी लग्न ठरवलं. घरात लग्नाची तयारी सुरू होती. याबाबत मामाला समजले. लग्न दुसऱ्या कुणाशीही कर मात्र शारीरिक संबंध ठेवायलाच लागतील, अशी धमकी दिली. त्याच्या लैंगिक अत्याचाराला त्रासून तरुणीने त्याला साफ नकार दिला. संतापलेल्या मामाने दोघांचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ तिच्या वडिलांच्या मोबाइलवर पाठवला. तो इतक्यावरच थांबला नाही तर, त्याने तो व्हिडिओ समाजातील इतर ओळखीच्या लोकांनाही पाठवला. अखेर तरुणीने मामाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here