मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी त्यांचा मुलगा भूषण देसाईंच्या राजकीय निर्णयावर भाष्य केलं आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत भूषण देसाई यांनी प्रवेश केला होता. या संदर्भात सुभाष देसाईंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भूषणच्या शिंदे गटात जाण्यानं काही परिणाम होणार नसल्याचं ते म्हणाले. शिवसेनेला गतवैभव मिळेपर्यंत शिवसैनिकांच्या सोबतीनं कार्य सुरु ठेवणार असल्याचं ते म्हणाले. मातोश्रीसोबत असलेली निष्ठा तशीच अढळ राहील, असं असंही सुभाष देसाई म्हणाले.

सुभाष देसाई काय म्हणाले?

“माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे”, असं सुभाष देसाई म्हणाले. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे, असंही सुभाष देसाई म्हणाले.

शीतल म्हात्रे प्रकाश सुर्वे मॉर्फ व्हिडिओ प्रकरणी SIT स्थापन, शंभूराज देसाईंची घोषणा, ठाकरे गटही आक्रमक

सुभाष देसाईंच्या मार्गदर्शनात आमचं काम सुरु : आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी माध्यमांसोबत बोलताना भूषण देसाई यांचा राजकारणाशी संबंध नव्हता असं म्हटलं. मात्र, ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये उडी मारायची असेल ते मारू शकतात. आम्ही सुभाष देसाईंच्या मार्गदर्शनात काम करत असल्याचं ते म्हणाले. सुभाष देसाई दररोज उद्धव ठाकरे यांच्यासोबत २४ तास पक्षासाठी काम करत आहेत. नेतेपद, मंत्रिपद नसलं तरी ते काम करत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही काम करत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

आमचा वाघ लढत राहील, साईनाथ दुर्गेंच्या अटकेवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया,भूषण देसाईंचा विषय चार शब्दात संपवला

दरम्यान, भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश केला. आता शिंदेंकडून त्यांना कोणती जबाबदारी मिळणार हे पाहावं लागेल.

‘मी आता बॉलिंग सोडून देऊ का…’ मालिकावीर पुरस्कारानंतर अश्विन असं का म्हणाला जाणून घ्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here