अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला चांगला भाव मिळत आहे. तर कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थित अकोल्याच्या बाजारात कापसाच्या भावाच्या तुलनेत तुरीला ७२० रुपयांनी जादा भाव आहे. त्यात विदर्भातील कापसाची पंढरी समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातीलच अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही कापसाचे भाव दिवसेंदिवस घसरत आहेत. आज अकोटच्या बाजारात ७ हजार ८०० पासून ८ हजार १९५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे कापसाला भाव आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला मिळणाऱ्या भावाच्या अपेक्षाभंग झाल्याचे चित्र आहे. म्हणून शेतकऱ्याला आता तुरीकडून अपेक्षा उरल्या आहेत.

अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोमवारी ६ हजार ७०० पासून जास्तीत जास्त ८ हजार ५०० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीला भाव होता. तर सरासरी भाव ७ हजार ७०० रूपये इतका असून आज २ हजार ५६७ इतकी तुरीची खरेदी झाली आहे. मागील काही दिवसातील तुरीचे दर पाहिले तर मागील बुधवारी अकोल्याच्या बाजारात तुरीला ६ हजार ५०० पासून ८ हजार ३०० भाव असून सरासरी भाव ७ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे होता. यादिवशी तुरीची आवक ८७६ क्विंटल झाली. गुरुवारी तुरीच्या दरात वीस रुपयांनी घसरण झाल्याने ५ हजार २५० पासून ८ हजार २८० रूपयांवर तुरीचे दर पोहचले होते. अन् आवकही कमी झाली होती. परंतु शुक्रवारी तुरीच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आलं. पांढऱ्या सोन्याला मिळणाऱ्या दरावर तुरीचे भाव गेल्याचे पाहायला मिळाले. ६ हजार ४०० पासून ८ हजार ४३० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे असून सरासरी भाव ७ हजार ६०० रुपये इतका तुरीला भाव होता. विशेष म्हणजे या दिवशी तुरीची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यानंतर शनिवारी तुरीचे भाव ६ हजार पासून ८ हजार ३८० रूपयांपर्यत गेले. म्हणजे शनिवारी अकोल्याच्या बाजारात तुरीच्या दरात ५० रुपयांनी घसरण झाली होती. परंतु आज तुरीच्या दरासंदर्भात नवीन अपडेट पाहता १२० रुपयांनी भाव वाढ झाली आहे.

कापसाच्या दराच्या तुलनेत ७२० रुपयांनी तुरीला जादा

आज अकोल्याच्या बाजारात कापसाला ७ हजार ७८० रूपयांपर्यत भाव मिळाला असून सरासरी भाव ७ हजार ७८० रूपये इतका होता. या तुलनेत तुरीचे दर ७२० रुपयांनी अधिक होते. शनिवारी कापसाला ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रूपयांपर्यत भाव असून आज कापसाच्या दरात ३२० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यात कापसाची आवक अतिशय कमी होत आहे. मात्र कापसाच्या दराच्या तुलनेत तुरीला चांगला भाव मिळत आहे.

मित्र रोज घरी यायचा, पत्नीशी सलगी वाढवली, बोलण्यास मज्जाव केल्यानंतर भडकला, पुढे घडले ते धक्कादायक

अकोटमध्ये कापसाकडून अपेक्षाभंग…

विदर्भातील कापसाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आज सोमवारी कापसाला ७ हजार ८०० पासून ८ हजार १९५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला. तर आवक २ हजार २०० क्विंटल इतकी झाली. अकोटच्या कृषी बाजारातही मागील काही दिवसात कापसासंदर्भातील दर पाहिले तर मागच्या बुधवारी ८ हजार पासून ८ हजार ४५५ रूपये. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी कापसाच्या दरात ९५ रुपयांनी घसरण झाली असून ७ हजार ८५० ते ८ हजार ३५० रुपये इतका कापसाला गेला होता. तर यादिवशी ३ हजार ४५ क्विंटल कापूस खरेदी झाला होता. शुक्रवारी कापसाच्या भाव ५ रुपयांनी कमी होऊन ८ हजार पासून ८ हजार ३५० रूपयांपर्यत आले. आज कापसाच्या दरात १५५ रुपयांनी घसरण झाली आहे. अकोटच्या बाजारात आज तुरीला ६ हजार ६०५ ते ८ हजार १७० रूपये भाव आहे.

बाळासाहेब,उद्धवसाहेबांसह मातोश्रीवरील पाच दशकांची निष्ठा अढळ राहील,मुलगा शिंदे गटात हे क्लेशदायक: सुभाष देसाई

दोन दिवसात ८ हजार ८३५ क्विंटल हरभऱ्याची आवक

अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी हरभऱ्याला कमीत कमी ४ हजार पासून जास्तीत जास्त ४ हजार ७८० रूपये इतका भाव असून सरासरी भाव ४ हजार ४०० रूपये इतका होता, आवक ४ हजार ४४० इतकी झाली. आज हरभऱ्याच्या भावात घसरण झाली असून कमीत कमी ४ हजार पासून जास्तीत जास्त ४ हजार ७६० रूपये इतका भाव मिळाला. तर, सरासरी भाव ४ हजार ४०० रूपये आहे. तर आवक ३ हजार ३४५ इतकी होती. दरम्यान शुक्रवारच्या दराच्या तुलनेत आज हरभऱ्यामध्ये चाळीस रुपयांनी घसरण झाली आहे. आज अकोटच्या बाजारात हरभऱ्याला ४ हजार २६५ पासून ४ हजार ६७५ रुपये इतका प्रतिक्विंटल प्रमाणे होता.

नाटू, नाटू गाण्यावर अश्विन व जडेजाची धमाल, एकदा व्हिडिओ पाहाल तर पुन्हा पुन्हा क्लिक कराल

१२ ते १५ हजारांचा खर्च फुकट गेला; बाजार समितीतही शून्य किंमत; शेतकऱ्यानं बाजारात फुकट कोथिंबीर वाटली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here