छिंदवाडा येथील जिल्हा रुग्णालयात तिला नेलं तेव्हा तिची प्रकृती पार चिंताजनक होती. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तिचा जीव वाचू शकला नाही. या घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तर तिच्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीये.
सिमरन अहिरवार ही काही मुलांसोबत खेळत होती, तेव्हा अचानक तिच्या गळ्याभोवती असलेला धागा घट्ट झाला आणि तिचा गळा आवळला गेला. तिला अस्वस्थ वाटू लागले, तिला श्वास घेता येईना. सोबत खेळत असलेल्या मुलांनी लगेच सिमरनच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय तिला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हा धागा इतका घट्ट झाला होता की सिमरनचा श्वास गुदमरला. डॉक्टरही तिला वाचवू शकले नाहीत.
या घटनेने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडालं आहे. सिमरनला निरोप देण्यासाठी अख्खं गाव जमलं, तिच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं होतं. सिमरनला तिच्या ५ वर्षांच्या लहान भावाने अग्नी दिला. त्यानंतर तो देखील बेशुद्ध होऊन पडला. या घटनेने या चिमुकलीच्या कुटुंबाला मोठा धक्काबसला आहे.