लखनऊ: उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री (Kamla Rani Varun) यांचे आज (रविवारी) करोनामुळे () निधन झाले. त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, कमलराणी यांच्या शरीरात करोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्यांची १७ जुलै रोजी तपासणी करण्यात आली. त्यानंतर १८ जुलै या दिवशी त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यानंतर त्यांना लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कमलराणी या कानपूरमधील घाटमपूरच्या आमदार होत्या. शनिवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, आज रविवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (cabinet minister kamal rani varun dies due to corona)

राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनीही त्यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील माझ्या सहकारी मंत्री कमलराणी वरुण यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने दु:ख झाले आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले आहे. राज्याने आज एक निष्ठावंत समर्पित नेता गमावला आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उत्तर प्रदेश कॉंग्रेसनेही कमलराणी यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. कमलराणी यांच्या निधनाची अत्यंत वाईट बातमी असून, उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कमलराणी वरुण यांचे आज निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना नम्र श्रद्धांजली. देव त्यांच्या कुटुंबियांना या दु: खाच्या घटनेत धैर्य देईल, असे उत्तर प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे.

शनिवारी समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार अमरसिंह यांच्या निधनाच्या बातमीने कमलराणी यांना धक्का बसला होता. राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांचे निधन झाल्याची अतिशय दु:खदायक बातमी आपल्याला मिळाली. त्यांच्या अकाली निधनाबद्दल मी शोक व्यक्त करते. या दु: खाच्या घटनेत मी त्याच्या कुटुंबीय व सहकार्‍यांसमवेत शोक व्यक्त करते आणि दिवंगत आत्म्यास शांती मिळावी यासाठी देवाला प्रार्थना करते, असे कमलराणी यांनी म्हटले होते.

वाचा:

वाचा:
प्रयागराजमधील भाजपा खासदार रीता बहुगुणा जोशी यांनीही कमलराणी वरुण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील सहकारी कॅबिनेट मंत्री कमलराणी वरुण यांच्या अकाली निधनाची बातमी हृदय हेलावणारी आहे. राज्याने आज एक निष्ठावंत समर्पित नेता गमावला. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असे बहुगुणा यांनी म्हटले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here