boy fell in borewell in ahmednagar, अहमदनगरः आठ तासांची झुंज व्यर्थ; १५ फुट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सागरचा दुर्दैवी मृत्यू – 5-year-old boy dies after falling into 15-feet deep borewell in ahmednagar
कर्जत, अहमदनगर: कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शेतातील बोअरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षाचा मुलगा पडल्याचे घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजता घडली. सागर बुधा बरेला असं या चिमुकल्याचं नाव आहे. या मुलाला वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू होते. एनडीआरएफच्या पाच तुकड्या यावेळी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र, या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
संध्याकाळी सहाच्या सुमारास हा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. या सर्व परिस्थितीवर तालुका प्रशासनही लक्ष ठेवून होते. कोपर्डी येथील संदीप सुद्रिक यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांचा हा पाच वर्षांचा मुलगा आहे. हे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील आहे. बोअरवेलच्या १५ फूट खोलीवरती हा मुलगा असल्याचे जाणवत असून त्याला वाचवण्यासाठी समांतर दोन जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू होते. घटनास्थळी कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयाची टीम , कर्जत नगरपंचायतचे अग्निशमन दल यांच्यासह महसूल प्रशासन तळ ठोकून होते. लंडनसारखं ‘मुंबई आय’; वांद्र्यातून होणार विहंगम मुंबईचे दर्शन, उभारणार उंच गच्ची NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बोअरवेल खोदण्यात आलेल्या खड्ड्यात १० फुटानंतर अचानक खडक लागला. त्यामुळे सागरला काढण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागला. दरम्यान NDRF च्या अथक बचावकार्यामुळे ५ वर्षीय सागरला १५ फुटी बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. अडीच वाजण्याच्या सुमारास मुलाला बाहेर काढण्यात आले त्यावेळी तो मृत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलंय.