जेव्हा कळलं सुशांत दरवाजा उघडत नाहीये
सुशांतच्या केसमध्ये रियानंतर सर्वच जवळील व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात येत आहेत. सुशांतसोबत त्याच्या घरी राहणाऱ्या सिद्धार्थने एका वाहिनीला त्या दिवशी काय घडलं याचा लेखाजोखा दिला. सिद्धार्थ सकाळचा चहा घेत असताना त्यांच्या स्वयंपाकी केशवने सुशांतचा दरवाजा ठोठावला. पण त्याने तो उघडला नाही. दुपारच्या जेवणात काय हवं ते विचारण्यासाठी केशव त्याच्या रूममध्ये गेला होता. सिद्धार्थने जेव्हा सुशांतचा दरवाजा ठोठावला पण त्याने आतून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यानंतर सिद्धार्थने खालच्या फ्लोअरला उतरून दीपेशला सांगितलं की सुशांत दरवाजा उघडत नाहीये.
जोर- जोरात वाजवू लागले दरवाजा
दोघांनीही संपूर्ण घरात दरवाजाची चावी मिळते का ते शोधलं. यावेळी आम्ही दरवाजा वाजवतच होतो. आम्ही इतक्या जोरात दरवाजा वाजवत होतो की खालपर्यंत आवाज जात होता. अखेर आम्ही चावीवाल्याला बोलावण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत मी मीतू दीदीलाही फोन केला होता आणि सुशांत दरवाजा उघडत नसल्याचं सांगितलं होतं.
थंड पडलेला सुशांत
सिद्धार्थ म्हणाला की, ‘आम्ही चावीवाल्याला बोलावलं आणि दरवाजा उघडल्यानंतर आम्ही त्याला परत पाठवलं. आम्ही त्याला पैसे दिले. मी पहिला व्यक्ती होतो ज्याने सुशांतला या अवस्थेत पाहिलं. ते फारच भीतीदायक होतं. मी लगेच पोलिसांना फोन केला आणि त्याची नस तपासून पाहिली पण तोपर्यंत तो थंड पडला होता. यानंतर ज्या कपड्याला तो लटकला होता तो कपडा मी कापला. दिपेश आणि मी त्याला तिथून उचलून बेडवर झोपवलं तोवह मीतू दीदीही आली होती.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
These are actually great ideas in concerning blogging.
Thanks so much for the blog post.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.