पंजाब : पंजाबच्या फाजिल्का इथं एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरी सुंदर मुलाचा जन्म झाला. मुल इतकं सुंदर होतं की आईने त्याचं नाव लॉरेन्स असं ठेवलं. लॉरेन्स हा एक खिश्चन शब्द असून याचा अर्थ सुंदर असा होता. घरात चांगली श्रीमंती होती. वडिलांकडे खूप जमिनी होत्या. त्यामुळे पैशांची काहीही कमी नव्हती. यामुळे लॉरेन्सचे लहानपणापासूनच सर्व पूर्ण झाले. त्याला अगदी आलिशान लाईफस्टाइल जगता आली. पण यासगळ्याचा शेवट भयंकर ठरला.

IPS ऑफिसर नव्हे तर गुंड बनायचं होतं तरुणाला….


लॉरेन्स बिश्नोई यानं अबोहर इथल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. वडिलांची इच्छा होती की त्याने पोलीस व्हावं. त्यांना त्याला IPS अधिकारी बनवायचं होतं, पण आईच्या लाडात लॉरेन्सने वेगळाच मार्ग निवडला. दिसायला अतिशय देखणा आणि तरुण्या लॉरेन्सने कॉलेजपासूनच नेतृत्वाला सुरुवात केली. लहानपणापासूनच त्याच्यात नेतृत्वगुण होता. कॉलेजमध्ये त्याने SOPU नावाने विद्यार्थी संघटना स्थापन केली. इतकंच नाहीतर कॉलेजमध्ये असतानाच त्याने रिव्हॉल्व्हर विकत घेतली होती.

Crime Diary: रोज थोडं-थोडं करून पतीला जीव घेतला, पुरावाही नाही ठेवला; वाचा सायलंट किलर ‘सौ’ची कहाणी…

Notorious gangster Lawrence Bishnoi 1280

Notorious gangster Lawrence Bishnoi

तरुणाईचा सोशल साइटवर प्रभाव…

लॉरेन्सने स्वत:ला प्रसिद्ध करण्यासाठी कॉलेजमध्ये गुंडागर्दी, विरोधी गटांशी हाणामारी, मारामारी, हवेत गोळीबार करणं असे प्रकार सुरू केले. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये त्याच्याविषयी भीती निर्माण झाली. तो लोकांमध्ये प्रसिद्ध झाला. चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये तो आयकॉन ठरला होता. यानंतर त्याने आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी सोशल साइट्सची मदत घेतली. बहुतेक लोक गुन्हे करून लपतात, पण पंजाबच्या या मुलानं गुन्ह्याची नवी कहाणी लिहायला सुरुवात केली. कोणी गुन्हा केला की लगेच तो फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल साइटवर अपलोड करण्यास त्याने सुरुवात केली. त्याची स्टाईल पाहून तरुणाई प्रभावित होऊ लागली. एकीकडे त्याची गुन्हेगारी पातळी वाढत होती तर दुसरीकडे त्याची फॅन फॉलोइंगही वाढत होती.

परदेशात मोठं नेटवर्किंग…

आता अनेक तरुण मुलं लॉरेन्सशी त्याच्या सोशल साइट्सच्या अकाऊंटवरून कनेक्ट व्हायला लागली होती. त्याला अगदी मोठा गुंड व्हायचं होतं. दरम्यान, लॉरेन्सनेही आपलं नेटवर्क वाढवण्यास सुरुवात केली होती. त्याच्यासोबत त्याचे काही मित्रही होते. लॉरेन्सचे परदेशात विशेषतः मलेशिया आणि थायलंडमधील गुंडांशीही संबंधात होता. आताही लॉरेन्स फक्त परदेशी क्रमांक वापरत होता. शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या डीलर्सनी लॉरेन्सच्या सोशल साइट्सच्या माध्यमातून संपर्क साधण्यास सुरुवात केली.

Crime Diary : पती-मुलाच्या मृतदेहासमोरच बॉयफ्रेंडवर लुटलं शारिरीक प्रेम, वासना इथेच थांबली नाही तर…

सर्व सौदे कोड वर्डमध्ये करायचा…

सगळ्यात विशेष म्हणजे लॉरेन्स कधीही समोरच्याला भेटायचा नाही. त्याचं सगळं काम सोशल साईट्सच्या माध्यमातूनच व्हायचं. यामुळे प्रभावित झालेल्या मुलांना त्याच्या नेटवर्कमध्ये जोडण्यास सुरुवात केली. अनेक अल्पवयीन मुलंही त्याच्या टोळीचा भाग होती. त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तो शाळा कॉलेजच्या पोरांना पिस्तूल आणि गोळ्या द्यायचा आणि लॉरेन्स सांगेल ते काम करायला मुलं तयार व्हायची. पंजाबच नाही तर शेजारील राज्यातील मुलेही त्याच्या टोळीचा भाग होऊ लागली.

Lawrence Bishnoi booked

Three decades later, Lawrence Bishnoi is a ‘terrorist’ booked under the Unlawful Activities Prevention Act by National Investigation Agency and Delhi Police.

लॉरेन्स स्वतः कधीच कोणाला भेटला नाही….

लॉरेन्स मुलांना फक्त व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम किंवा फेसबुक मेसेजद्वारे मेसेज द्यायचा. ही आज्ञा कोड वर्ल्डमध्ये देखील असायची. लॉरेन्सचा आदेश आल्यानंतर ही मुले स्वत: शस्त्र पुरवठादारांना भेटायचे, ते काम करण्यासाठी शस्त्रे घ्यायची आणि काम झाल्यावर शस्त्रे परत करायची. इतकंच नाहीतर लॉरेन्स टोळीने खून, अपहरण, खंडणी अशी कामे सुरू केली होती. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण पोलिसांनी लॉरेन्सला अटक केली होती. पण त्याने तुरुंगात बसून आपलं नेटवर्क चालवत राहिला.

Crime Diary: पतीचे ५, सासूचे ३ तुकडे; फ्रीजमध्ये गोठवले अन्…; भोळ्या चेहऱ्यामागे थरकाप उडवणारा खूनी खेळ

गुन्ह्यात कधीच थेट नाव घेतलं नाही…

या संपूर्ण प्रकरणात लॉरेन्सचे नाव थेट कुठेही येत नाही. पोलिसांना सर्व काही माहीत होतं, पण त्यांची इच्छा असूनही ते लॉरेन्सला काही करू शकले नाही. लॉरेन्सची गुन्हेगारी सिंडिकेट वाढत होती. लॉरेन्सच्या टोळीत ६०० हून अधिक नेमबाज होते. या टोळीला सर्व आधुनिक शस्त्रे परदेशातून पुरवली जातात. लॉरेन्स टोळीसोबत वेगवेगळ्या राज्यातील अनेक गुंडही जवळून काम करतात. कला राणा आणि गोल्डी ब्रार हे लॉरेन्सचे चांगले मित्र आहेत.

गायक मुसेवाला यांच्या हत्येचा आरोप…

काला जथेडी, जग्गू भगवानपुरिया, लॉरेन्स टोळी या सर्व गुंडांसह सक्रिय असायची, मात्र सिंगर मुसेवाला प्रकरणानंतर लॉरेन्स गँगचीही जग्गू भगवानपुरिया टोळीशी मारामारी झाली. गायक सिद्धू मूसवाला खून खटलाही लॉरेन्स टोळीने चालवला होता आणि लॉरेन्सचा जिवलग मित्र गोल्डी ब्रारनेही याची जबाबदारी घेतली होती. तोपर्यंत जग्गू भगवानपुरिया हा देखील लॉरेन्ससोबत होता आणि त्यानेच मुसेवालाच्या हत्येसाठी शस्त्रे आणि वाहने पुरवली होती. लॉरेन्स टोळीशिवाय जग्गू भगवानपुरिया टोळीच्या शूटरलाही या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Crime Diary : नदीतून निघाले एकामागे एक मृतदेह, पोलिसांना वाटली आत्महत्या; तपासात उलगडलं ७ जणांच्या हत्येचं गूढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here