गाझियाबाद: गाझियाबादच्या लोनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड महिन्यापूर्वी झालेल्या रिक्षाचालकाच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. अवघ्या दोनशे रुपयांसाठी दोन तरुणांनी रिक्षाचालकाची चाकूने भोसकून हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

लोनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ आणि १८ जूनच्या रात्री दिल्लीतील एका झाली होती. घटनेनंतर दीड महिन्यांनी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन तरुणांनी २०० रुपये प्रवासी भाड्यासाठी रिक्षाचालकाची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. गाझियाबादचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कलानिधी नैथानी यांनी या घटनेची माहिती दिली. १७ आणि १८ जून दरम्यान रात्रीच्या सुमारास दिल्लीतील रहिवासी मोहिद्दीन या रिक्षाचालकाची लोनी परिसरात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक नीरज कुमार जादौन यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाची स्थापना केली होती. या पथकाने दीड महिन्यांनी या हत्येचा छडा लावला आहे. या प्रकरणी आरोपी मोनू आणि आफताब या दोन तरुणांना अटक केली आहे.

दिल्लीहून लोनी येथे जाण्यासाठी हे दोघे मोहिद्दीन याच्या रिक्षात बसले होते. त्यांच्याकडे प्रवासी भाडे देण्यासाठी पैसे नव्हते. प्रवासी भाड्यापोटी २०० रुपये झाले होते. मात्र, ते न देताच दोघेही रिक्षातून निघून गेले. मोहिद्दीनने त्यांना अडवले आणि त्यांच्याकडे पैसे मागितले. यावरून दोघांनी मोहिद्दीनची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींना अटक करणाऱ्या पोलिसांच्या पथकाला १५ हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली होती. या हत्येतील आरोपी हे मोबाइल फोन वापरत नव्हते. त्यामुळे या हत्येच्या घटनेचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांकडून आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस या दोन आरोपींपर्यंत पोहोचले. या दोघांनी रिक्षाचालकाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह रिक्षाजवळच फेकून ते घटनास्थळावरून पसार झाले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here