pune latest news in marathi, पतीचा बायकोवरील राग पुणेकरांना पडला महागात, पोलिसांत घटस्फोटासाठी तक्रार दिल्याने काय केलं तुम्हीच पाहा… – wife filed complaint with police for divorce angry husband set fire to 8 to 10 vehicles in the area pune news
पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दाखल केल्याने चिडलेल्या नवऱ्याने बायकोच्या गाडीसह परिसरातील ८ ते १० दुचाकी आणि ४ चाकी गाड्या पेट्रोल टाकून पेटवल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील अश्रफ नगर परिसरातील अलिप टावर समोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. टेरेन्स जॉन असं आरोपी पतीचं नाव आहे. त्याच्या पत्नीने पोलिसांत जॉनच्या विरोधित तक्रार दाखल करत घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. यामुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून यावर आता पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. Crime Diary : वडिलांना वाटलं मुलाने IPS व्हावं, पण झाला सगळ्यात मोठा गँगस्टर, एकट्याने तयार केलं क्राइम हब…
घटस्फोटाच्या अर्जावरून चिडलेल्या जॉन याने पत्नीच्या दुचाकीसह परिसरातील चारचाकी, कारस रिक्षा आणि इतर वाहन पेट्रोल टाकून पेटवून जाळल्याच्या धक्कादायक घटनेने कोंढव्यात खळबळ उडाली आहे. आरोपी टेरेन्स आणि त्याची पत्नी एलिना जेकेब यांचा ६ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपी कोणतेही काम धंदा करत नव्हता म्हणून पत्नीने त्याच्या विरोधात पोलिसामार्फत घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे.
या कारणावरून चिडलेल्या आरोपीने थेट पत्नीच्या गाडीसह परिसरातील वाहनेच पेटवून दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यावर आता पोलीस घटनेचा तपास करत असून आरोपीवर काय कारवाई होणार? ज्यांच्या वाहनांचं नुकसान झालं अशांना मदत मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.