सोन्या आणि चांदीचा ताजा भाव
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव ५७ हजार ४१५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला असून आज त्यात २२७ रुपयांची घसरण होताना दिसत आहे. तसेच कालच्या तुलनेत दरांमध्ये ०.३९ टक्क्यांची कमजोरी दिसत असून आजच्या ट्रेडिंग सत्रात भाव ५७,४९३ रुपयावर पोहोचला होता. लक्षात घ्या की सोन्याच्या या किमती एप्रिल फ्युचर्ससाठी आहेत. दरम्यान, किरकोळ बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आर्थिक राजधानी मुंबईत सोन्याचा दर ७६० रुपयांनी वाढला असून आज तुम्हाला खरेदीसाठी ५७ हजार ९८० रुपये प्रति १० ग्रॅम मोजावे लागतील.
दुसरीकडे, मे फ्युचर्सच्या चांदीचे भाव आज घसरणीसह व्यवहार करत आहेत. चांदीचा भाव ३६७ रुपये स्वस्त होऊन ते ६६,२८५ रुपये प्रति किलोवर पोहोचले आणि आज त्यात ०.५५% घसरण होताना दिसत आहे. आजच्या व्यवहार सत्रादरम्यान, चांदीचा भाव ६६,४७७ रुपयांपर्यंत वाढला होता तर ६६,२८० रुपये प्रति किलोपर्यंत घसरला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारातील आज सोन्या-चांदीचा भाव काय?
जागतिक बाजारात देखील सोन्या आणि चांदीचा भाव हिरव्या रंगात व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीने कालच्या दरवाढीत आणखी वाढ नोंदवली असून भाव प्रति औंस $१,९०२.१० वर वाढला आहे. तर चांदीचा भाव प्रति औंस २१.७४७ डॉलरवर होता.
याआधी सोमवारी, नियामकांनी दोन यूएस बँकांना टाळे लागल्यानंतर डॉलर आणि रोखे उत्पन्न बुडाल्याने फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमतीने प्रथमच $१,९०० चा टप्पा गाठला.