नवी मुंबईः बोरीवलीत राहणारे कुटुंब गावावरुन घरी यायला निघाले मात्र वाटेतच २० जणांच्या टोळक्याने हल्ला करत मारहाण करत लुटमार केली आहे. सोमवारी पेण येथे मध्यरात्री ३च्या सुमारास ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरटे तीन काममधून आले होते तसंच ते मद्यधुंद अवस्थेत होते. हल्लेखोरांनी पीडितांच्या कारवर सुरुवातीला दगडफेक करुन काचा फोडल्या तसंच, स्टम्पने दोघांवर हल्ला केला व त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावून नेल्या व महिलेचे मंगळसूत्रही हिसकावले. कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

बोरीवली येथे राहणारे मोहिते कुटुंब रत्नागिरी येथुन पुन्हा मुंबईत परतत असताना ही घटना घडली आहे. हल्ला झाला त्यावेळी त्या गाडीत दोन मुलं आणि दोन जेष्ठ नागरिकदेखील होते. मुंबईत परतत असताना त्यांनी रायगडजवळीच पेण जवळील एका हॉटेलसमोर गाडी थांबवली. त्यानंतर एक छोटा ब्रेक घेऊन तिथून निघत असताना एका कारने त्यांची गाडी अडवली आणि कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगडफेक केली, असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

Mumbai Eye: लंडनसारखं ‘मुंबई आय’; वांद्र्यातून होणार विहंगम मुंबईचे दर्शन, उभारणार उंच गच्ची
प्रशांत मोहिती हे त्यावेळी गाडी चालवत होते. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर प्रशांत यांनी त्या कारचा पाठलाग केला. तसंच, त्यांना जाब विचारले. मात्र, त्याचवेळी गाडीतील चौघांना स्टंम्पने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसंच, त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन हिसकावल्या. तसंच, प्रशांतच्या पत्नीने पती व भावाला वाचवण्यासाठी धाव घेतला असता दोघांनी तिचे मंगळसूत्र हिसकावले.

दहावीचा पेपर सुरु असतानाच मुलीच्या हातात ‘लग्नाच्या बेड्या’; बीडमध्ये आणखी एक बालविवाह
दरम्यान, या सगळ्या झटापटीत हल्लेखोरांच्या कारचे नुकसान झाले आहे. त्यानंतर त्यांनी कार तिथेच सोडून पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच राजस्थान आरटीओ नंबर प्लेट असलेली कार जप्त करण्यात आली आहे. मोहिती कुटुंब सुट्टीवरुन मुंबईत परतत असताना ही घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शिवसेनेत ६ महिने हेरगिरी करायला आला होतात का? शिवसैनिकांकडून धैर्यशील मानेंवर प्रश्नांचा भडीमार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here