Shinde Vs Thackeray | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह ताब्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे पुढचे लक्ष्य या शिवसेनेच्या शाखा असल्याचे सांगितले जाते. त्यादृष्टीने अंबरनाथमध्ये शिंदे गटाकडून शिवसेना शाखा ताब्यात घेतल्या जात आहेत.

हायलाइट्स:
- अंबरनाथ शहरात ठाकरे गटाला मोठा धक्का
- ठाकरे गटाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे
अंबरनाथमधील ठाकरे गटाच्या शहरप्रमुखांसाह बहुतांशी पदाधिकारी हे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सोमवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचीही या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. या भेटीत प्रवेशासंबंधी सकारात्मक चर्चा होताच शिवसेनेच्या शहर शाखेतून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो मात्र कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळं ठाकरे गट शहर शाखेसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेच्या शाखांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शिवसेनेच्या शाखा थेट ताब्याला घ्यायला गेल्यास संघर्ष होऊ शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून टप्याटप्प्याने शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेतल्या जाऊ शकतात.
वाळेकर कुटुंबीय समर्थकांसह शिंदे गटात सामील
ठाणे जिल्हा आणि त्यातही अंबरनाथ शहरात शिवसेनेचा दबदबा आहे. एकनाथ शिंदे यांची शहरावर एकहाती पकड आहे. त्यांच्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही पकड आणखी मजबूत केली. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आमदार, माजी नगराध्यक्ष आणि काही माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी सोडल्यास एक मोठा गट त्यांना पाठिंबा देण्यापासून दूर राहिला होता. त्यात खुद्द शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्षा आणि नगरसेवक, तसेच पदाधिकारीही त्यांच्यासोबत शिंदेंपासून अंतर राखून होते. मात्र राजकीय परिस्थिती शिंदे यांच्याकडे झुकत असल्याचे दिसल्यानंतर शिवसेनेतील निष्ठावान आणि शहरात ताकद असलेले वाळेकर कुटुंबीय तसेच त्यांचे समर्थक शिंदे गटात सामील झाले.
सांगितलं होतं ना आपल्या वाट्याला कुणी जायचं नाही, मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं ना; उद्धव ठाकरेंना सुनावलं
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.