चंद्रपूर: ताडोबा व्याघ्र प्रकल्पात माया ही सर्वात प्रसिद्ध वाघीण आहे. या वाघिणीवर रुद्रा आणि बलराम या दोन्ही वाघांच्या जीव जडला. मायासाठी दोघेही एकमेकांशी भिडले. रक्तबंबाळ झाले. या टोकाच्या लढाईत अखेर बलराम विजेता ठरला. ताडोबाचा मोहुर्ली बफर क्षेत्रात रविवारला प्रेमासाठी झालेला हा थरार बघायला मिळाला. वन कर्मचाऱ्यांना माया वाघीण बलरामसोबत एकत्र फिरताना दिसली आहे. त्यामुळे मायाचे हृदय बलरामने जिंकल असं बोललं जातं आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांना बघण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येत असतात. येथील वाघांचा डरकाळीने ताडोबाचे रान शहारत असते. तर यांच्या कारामतीने तेवढीच करमणूकही होत असते. ताडोबावर आपला अधिकार गाजवण्यासाठी येथील वाघात अधून मधून तुंबळ लढाई झालेल्या आहेत. मात्र रविवारला दोन वाघ थेट प्रेमासाठी आपसात भिडलेत.

वाघच घाबरला! म्हशींचा कळप धावताच ठोकली धूम, ताडोबातील थरारक VIDEO व्हायरल…
ताडोबातील रुद्रा व बलराम हे दोन बलाढ्य वाघ आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी यांची लढाई सुरू असल्याची चर्चा समाज माध्यमावर आहे. अश्यात माया वाघिणीसाठी दोघे आमने सामने उभे झालेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहुर्ली वन परिक्षेत्रातील जंगल परिसरातील बलराम आणि रुद्र यांच्यात लढाई झाली. रविवारी सकाळच्या सुमारास झालेली ही लढाई अनेक पर्यटकांनी बघितली. या लढाईत दोन्ही वाघ जखमी झालेत. या लढाईनंतर वन कर्मचाऱ्यांना माया वाघीण आणि बलराम दोघेही एकत्र दिसलेत. त्यामुळे रुद्र आणि बलरामात झालेल्या लढाईत बलराम जिंकला, असं बोललं जात आहे.

लांबच्या प्रवासाला जाताय! ट्रेनमध्ये मिळेल गरमा-गरम जेवण, हा व्हॉट्सअॅप नंबर सेव्ह कराच

जुनाबाई आणि डागोबाची पिल्लांसह मस्ती कॅमेरात कैद; तलावाकाठी बछड्यांवर प्रेम करणारी वाघीण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here