मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही दर्जेदार शेअर्स शोधत असाल तर टाटा ग्रुपचा टाटा मोटर्स हा चांगला पर्याय ठरू शकतो. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस नोमुराने टाटा मोटर्सचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजच्या मते सध्याच्या किमतीच्या पुढे या शेअरमध्ये सुमारे २० टक्क्यांपर्यंत तेजी दिसून येईल. गेल्या तीन वर्षांत हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला असून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तिपटीने वाढ झाली आहे. बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा मोटर्सचा समावेश आहे.

Stock Market Opening Today: अमेरिकेतील घडामोडींनी मार्केटचा मूड बिघडला, पाहा सुरुवातीचा ट्रेंड
२०% पर्यत वाढण्याची शक्यता
नोमुराने टाटा मोटर्सच्या शेअरवर खरेदी सल्ला कायम ठेवला आहे. यासोबतच प्रति शेअर किंमत ५०८ रुपये ठेवण्यात आली आहे. १३ मार्च २०२३ रोजी शेअरची किंमत ४२२ रुपयांवर बंद झाली होती. अशाप्रकारे सध्याच्या किंमतीपासून शेअर्समध्ये सुमारे २० टक्क्यांची आणखी तेजी दिसू शकते. गेल्या वर्षभरातील शेअर्सचा परतावा सपाट असला तरी तुम्ही तीन वर्षांच्या परताव्यावर नजर टाकली तर हा शेअर मल्टीबॅगर ठरल्याचे दिसून येईल. टाटा मोटर्समध्ये गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना सुमारे ३६९ टक्के परतावा मिळाला आहे. १३ मार्च २०२० रोजी टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत ८९.७५ रुपये होती.

IPO बाजार बहरणार, गुंतवणूकदारांना लवकरच कमाईचा मोका; जाणून घ्या सविस्तर माहिती
टाटा मोटर्सची आर्थिक स्थिती
टाटा मोटर्स तिसऱ्या तिमाहीत तोट्यातून नफ्यात आली होती. मागील वर्षी याच कालावधीत १५१६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २,९५८ कोटी रुपये होता. कंपनीचे उत्पन्नही डिसेंबरच्या तिमाहीत ८८,४८९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ७२,२२९ कोटी रुपये होते. तिसऱ्या तिमाहीत Jaguar Land Rover च्या उत्पन्नात २८% वाढ झाली आहे.

छप्परफाड कमाई! टाटा समूहाचा रॉकेटसिंग शेअर, गुंतवणूकदारांवर पैशाचा पाऊस पाडला!
रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक
दिवंगत दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टाटा मोटर्सचा १.६ टक्के हिस्सा (५२,२५६,००० इक्विटी शेअर्स) आहे. डिसेंबर २०२२ तिमाहीसाठी बीएसईवरील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार या होल्डिंगची किंमत सध्या २,१९५ कोटी रुपये आहे. झुनझुनवाला कुटूंब मार्केटमधील अनुभवी गुंतवणूकदार आहेत. राकेश झुनझुनवाला यांचे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निधन झाले. हा शेअर झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये बऱ्याच काळापासून समाविष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here