न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचा पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून जातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर त्याबद्दल उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. जो बायडन पज्ञकारांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांना सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्याबद्दल आणि देशातील बँकांबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर बायडन यांनी प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आणि पत्रकार परिषद अर्ध्यातच सोडून दिली आणि ते निघून गेले.

बायडन यांचा व्हिडिओ व्हायरल

जो बायडन यांनी पत्रकार परिषद अर्ध्यात सोडल्यानं नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. बायडन यांचा हा व्हिडिओ व्हाईट हाऊसच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओला जवळपास ४० लाख लोकांनी पाहिलं होतं. कमेंट करुन लोक टीका करु लागताच त्या व्हिडिओचा कमेंट बॉक्स बंद करण्यात आला.

व्हिडिओ

बँकिंग प्रणाली व्यवस्थित राखण्यासाठी ऐतिहासिक आर्थिक सुधारणांची गरज असल्याचं जो बायडन म्हणाले होते. यावर एका पत्रकारानं सिलिकॉन व्हली बँके प्रमाणं इतर बँका बुडाव्यात असं तुम्हाला वाटतं का असा सवाल केला. यानंतर बायडन तिथून निघाले. ते तातडीनं पत्रकार परिषदेची खोली सोडून गेले.

प्रकाश सुर्वेंचा ‘तो’ व्हिडिओ ३२ देशातील लोकांना पाहिलाय, मुलाच्या फेसबुक अकाऊंटची तपासणी करा: दानवे

यापूर्वी चीनच्या स्पाई बलूनसंदर्भात पत्रकारांनी जो बायडन यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्यावेळी देखील जो बायडन सविस्तर उत्तर देण्याचं टाळलं होतं. ते तिथून निघून गेले होते. बायडन यांनी त्यावेळी देखील पत्रकारांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली नव्हती.

जो बायडन यांनी कोलंबियाच्या राष्ट्रपतींच्या भेट घेतली होती. त्या भेटीनंतर एका पत्रकारासोबत हास्यविनोद करत चर्चा करतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यावेळी जो बायडन पत्रकारांशी बोलण्यास नकार देतात कारण त्यांच्याजवळ उत्तरं नसतात, अशा चर्चा सुरु होत्या.

अधिक पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या EPFO चा नवीन आदेश

२०२१ मध्ये पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर न दिल्याबद्दल नेटकऱ्यांनी जो बायडन यांना सुनावलं होतं. सीबीएसच्या एका रिपोर्टरनं त्यांना शी जिनपिंग आणि इतर नेत्यांच्या बैठकीसंदर्भातील प्रश्नांची उत्तरं कधी देणार असा सवाल केला होता.

नितेश राणे आणि अबू आझमी यांच्यामध्ये विधीमंडळ परिसरात खडाजंगी

प्रकाश सुर्वेंचा व्हिडिओ ३२ देशातील लोकांनी पाहिला, मीच १० लोकांना फॉरवर्ड केला | अंबादास दानवे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here