म.टा. प्रतिनिधी, नगरः ‘करोनाचे रुग्ण हे सर्वत्र वाढत आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील रुग्ण वाढत आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु लॉकडाउन काही त्याचे उत्तर नाही, आणि ते सर्वत्र मान्य झाले आहे,’ अशी भूमिका आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मांडली.

नगर जिल्ह्यामध्ये करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यात करावे की नाही, यावरून विविध मतमतांतरे मांडले जाऊ लागले आहेत. काही लोकप्रतिनिधी लॉकडॉऊन करण्याची मागणी करत आहेत. तर त्याला काही लोकप्रतिनिधींकडून विरोध होऊ लागला आहे. नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना आमदार तांबे यांनीही लॉकडाऊन बाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले , करोना रुग्ण हे सर्वत्र वाढत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात देखील रुग्ण वाढत आहेत. कारण लॉकडाऊन जेव्हा आपण उठवले, तेव्हा त्या काळात जी काळजी घेतली गेली पाहिजे होती, ती नागरिकांकडून घेण्यात आली नाही. मध्यंतरी लग्न समारंभ झाली. तेथे जी काळजी घेतली गेली पाहिजे होती, ती घेतली गेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. परंतु लॉकडाऊन काही त्याचे उत्तर नाही, आणि हे सर्वत्र मान्य झालेले आहे. कारण लॉकडाऊनला दोन बाजू आहेत. लॉकडॉऊनमुळे सामान्य व गरीब लोकांचे हाल होतात. त्याऐवजी उपचाराबद्दल त्रिसूत्री वापरणे गरजेचे आहे. आम्ही संगमनेरमध्ये तसे केले असून ती यशस्वी होत आहे. करोनाचा सर्वांनी मिळून सामना करावा. मास्क वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, अशा साध्या साध्या गोष्टी सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे.’

वाचाः

संगमनेरवरील परिस्थितीवर थोरात यांचे लक्ष आहे

‘संगमनेरला करोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. पण येथे प्रशासन उत्कृष्ट काळजी घेत आहे. तेथे कुठल्याही प्रकारची ढिलाई नाही. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे देखील डोळ्यात तेल घालून येथे लक्ष देत आहे ,’ असेही आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले.

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here