या प्रकरणातील खरा व्हिडिओ कुठं आहे. खरा व्हिडिओ समोर आला आहे. राज प्रकाश सुर्वे यांनी फेसबुक लाईव्ह केलं आहे. हा व्हिडिओ राज प्रकाश सुर्वे यांनी बनवला आहे, त्यामुळं त्यांना अटक करावी, असं वरुण सरदेसाई म्हणाले.
व्हिडिओ प्रकरणाचे आजही पडसाद
प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओ प्रकरणी राज्य सरकारनं एसआयटीची घोषणा केली आहे. सुर्वे आणि म्हात्रे यांचा व्हिडिओ मॉर्फ करण्यात आल्याचा दावा करत आमदार यामिनी जाधव आणि आमदार मनिषा चौधरी यांनी आवाज उठवला होता. तर,शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी या प्रकरणाची चौकशी करेल, अशी घोषणा केली होती. या प्रकरणात काल रात्रीपर्यंत पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती.
अंबादास दानवे यांच्याकडून ओरिजनल व्हिडिओ समोर आणण्याची मागणी
जे लोक या प्रकरणात सहभागी नाहीत त्यांना अटक केली जाते. व्हिडिओ खरा आहे की मॉर्फ आहे यात जायचं नाही. व्हिडिओ ओरिजनल असेल तर आमदाराच्या मुलाच्या फेसबुकवरुन डिलीट का झाला? व्हिडिओ का डीलिट झाला असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. हा व्हिडिओ ३२ देशांमध्ये बघितला गेला. आमदाराच्या मुलाच्या फेसबुक लाईव्हवरुन प्रसारण सुरु होतं, असं अंबादास दानवे म्हणाले. सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी सुरु असतील तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची गरज आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.