Sushma Andhare on Sheetal Mhatre video | शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. सुषमा अंधारेंनी कायदेशीर बाजू मांडली आहे.

 

हायलाइट्स:

  • प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे बहीणभाऊ असतील तर सुर्वे काहीच का बोलत नाहीयेत?
  • शीतल म्हात्रेंचा व्हिडिओ व्हायरल करणं गुन्हा नाही
मुंबई: शीतल म्हात्रे यांनी दावा केल्याप्रमाणे प्रकाश सुर्वे आणि त्यांच्यात बहीणभावाचे नाते असेल तर बहिणीची इतकी बदनाम होत असताना, तिच्यावर खालच्या पातळीचे आरोप असताना एक भाऊ म्हणून सुर्वे समोर येऊन का बोलत नाहीत, असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. मुळात प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांना त्यांच्या नात्याविषयी स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. त्या दोघांनाही व्यक्तीस्वातंत्र्य आहे. त्यामुळे शीतल म्हात्रे यांनी सुर्वे आणि त्यांच्या नात्याविषयी स्पष्टीकरण देऊ नये. सत्याला स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. पण व्हायरल व्हिडिओप्रकरणात प्रकाश सुर्वे एकदाही फ्रेममध्ये आलेले नाहीत. बदनामी होत असेल तर शीतल म्हात्रे यांच्यासोबत प्रकाश सुर्वे यांचीही होत आहे. पण तरीही त्यांनी यावर चकार शब्द काढलेला नाही, याकडे सुषमा अंधारे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

शीतल म्हात्रे यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ बारकाईने पाहिल्यास तो खूप जवळून शुट झाला आहे. याचा अर्थ कोणत्यातरी जवळच्याच माणसाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, हे अगदी स्पष्ट आहे. आम्ही खोलात जाऊन माहिती घेतल्यावर हा व्हिडिओ प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. गदारोळ झाल्यानंतर तो डिलिट करण्यात आला. पण १ तास ४९ मिनिटांचा तो व्हिडिओ राज सुर्वे यांच्याच अकाऊंटवरु अपलोड झाला आहे. त्या व्हिडिओतील ठराविक पीस कोणीतरी बाजूला काढून त्याला गाणं लावलं. व्हिडिओला अशाप्रकारे गाणं लावणं चुकीचं असलं तरी ते गाणं चुकीचं आहे, असं म्हणता येणार नाही. कारण, या गाण्याला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली आहे. त्यामुळे गाणं लावण्याची पद्धत चुकली असली तरी गाण्यामध्ये काहीही वावगं नाही, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले.
शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या खास माणसाला पोलिसांनी मुंबई विमानळावरुन उचललं

व्हिडिओत गाण्याशिवाय अन्य कोणताही बदल नाही, व्हिडिओ व्हायरल करणे गुन्हा ठरू शकत नाही: सुषमा अंधारे

शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ त्यांच्याच मुलाने रेकॉर्ड केला आहे. आम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला आहे. बॅकग्राऊंडला गाणं लावण्याशिवाय व्हिडिओत कोणताही बदल नाही. मात्र, यावरुन आमच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. साईनाथ दुर्गे यांनाही मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. या सगळ्या कारवाईसाठी शीतल म्हात्रे यांची बदनामी झाली, असे कारण दिले जात आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर ३५४ अ हे कलम लावले आहे. त्यांच्यावर व्हिडिओ मॉर्फिंग किंवा व्हिडिओ व्हायरल केल्याचे कोणतेही कलम लावण्यात आलेले नाही. ३५४ अ या कलमामध्ये महिलेच्या इच्छेविरुद्ध लैंगिकता दाखवणे, त्याचा प्रचार आणि प्रसार करणे अशा गुन्ह्यांचा समावेश होतो. त्यामुळे पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांवर ३५४ अ हे कलम लावताना मोठी चूक केली आहे. यापू्र्वीही शीतल म्हात्रे यांनी इतर व्यक्तींविरोधात ३५४ अ कलमाचा वापर केला आहे. संबंधित व्हिडिओत लैंगिक कंटेट आहे, ही बाब पोलिसांनी आधीच मान्य केली आहे, असा त्याचा अर्थ निघतो. हे अत्यंत चूक आहे.
तुमची पापं लपवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू नका, शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात संजय राऊतांचा इशारा
जर पोलीस लैंगिक विकृती ठरवून आमच्या कार्यकर्त्यांवर ३५४ अ कलम लावत असतील तर त्याठिकाणी २९४ हे कलम आपोआप लागू होते. २९४ कलमामध्ये सार्वजनिक ठिकाणी लैंगिक कृती करण्याच्या गुन्ह्याचा समावेश होतो. त्यामुळे शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी ३५४ अ हे कलम लावून म्हात्रे यांचीच अडचण केली आहे. शीतल म्हात्रे यांच्या जवळच्या लोकांच्या आतातायीपणामुळे हा प्रकार घडला आहे. या कलमाच्या अंतर्भावामुळे शीतल म्हात्रे यांच्याच प्रतिमेची हानी होण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्यामागे एका महिलेला पुढे करून विरोधकांना सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंकाही सुषमा अंधारे यांनी बोलून दाखवली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here