सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग येथील देवगड तालुक्यातील बापार्डे बौद्धवाडी येथील भारत मुरारी सपकाळ (वय ५०) याने दारुच्या नशेत मध्यरात्री आई आणि आपला सख्खा भाऊ यांची दांड्याने ठेचून हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास समोर आली. आई शोभा मुरारी सकपाळ (वय ७५) आणि मोठा भाऊ महेंद्र मुरारी सपकाळ (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत मुरारी सकपाळ (रा. बापर्डे बौद्धवाडी) याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेतच त्याचा घरामध्ये आई आणि भाऊ यांच्याबरोबर वाद झाला होता. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास आई शोभा मुरारी सपकाळ आणि मोठा भाऊ महेंद्र मुरारी सपकाळ यांची झोपेत असताना दांड्याने ठेचून हत्या केली. दररोज सकाळी पाच वाजता उठणाऱ्या शोभा सपकाळ आणि त्यांच्या घरातली मंडळी अजून का उठली नाही? म्हणून येथील ग्रामस्थ आणि याची माहिती गावचे सरपंच व पोलीस पाटील यांना दिली.

श्रेयस अय्यरच्या प्रकृतीबाबत रोहित शर्माने दिले अपडेट्स, IPL खेळू शकणार की नाही जाणून घ्या…
सरपंच आणि पोलीस पाटील यांनी तात्काळ त्यांच्या घराकडे जात खिडकीतून बघितलं असता आई आणि मुलगा मृत अवस्थेत घरात दिसले. मात्र, त्यांचा दुसरा मुलगा भारत मुरारी सपकाळ हा घरात नसल्याने त्याची शोधाशोध सुरू केली. त्याची शोधाशोध सुरू असतानाच तो जंगलात सकाळी दहाच्या सुमारास सापडला. गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्यानेच आई आणि भावाची हत्या केली असल्याची कबुली त्याने त्यांच्याकडे दिली. त्यानंतर सरपंच आणि पोलीस पाटील यांनी तात्काळ ही घटना पोलिसांना कळविले, त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले.

याआधी केली होती पत्नीची हत्या

भारत मुरारी सपकाळ याने यापूर्वीही दारूच्या नशेत २००७ साली आपल्या पत्नीचा हेल्मेटच्या साहाय्याने हत्या केली होती. त्याची शिक्षाही भारत याने भोगली होती. त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर त्याची मुले मात्र त्याच्याजवळ राहत नसून ती दोन्ही मुलं आपल्या मामांजवळ राहत असल्याची माहिती मिळली आहे.

VIDEO : लाल वादळ निघालं, कष्टकरी शेतकऱ्यांच्या पायाला फोड अन् टाचा रक्तबंबाळ; मोर्चादरम्यान महिलेची तब्येत बिघडली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here