लखनऊ: आशिक हूं मैं, कातिल भी हूं, सबके दिलों में शामिल भी हूं… मैं लड़की की मांग भरकर उसे यहां से लेकर जाऊंगा… नवरदेवानं स्टेजवर शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये डायलॉग मारला. त्याच्या डायलॉगनं वधूपक्षासह तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचंच लक्ष वेधलं. नवरदेवानं फिल्मी स्टाईलनं एंट्री केल्याचं सुरुवातीला सगळ्यांना वाटलं. मात्र डायलॉगसोबत नवरदेवाच्या ‘कला’ पाहून नवरीनं लग्नास नकार दिला. यानंतर मंडपात पोलिसांना बोलवावं लागलं.

मऊमधील कोपागंज परिसरात असलेल्या दोस्तपुरा मोहल्ल्यात आझमगढच्या फूलपूरमधील बटुईपारातून वरात आली होती. मुलीकडच्यांनी धुमधडाक्यात वरातीचं स्वागत केलं. यानंतर जयमालाची तयारी सुरू झाली. तेव्हा नवरदेव स्टेजवर गेला. फिल्मी डायलॉग म्हणू लागला. ते पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला.
तोंडाला फेस, रक्त साकळलेलं, शरीर काळवंडलेलं; आनंद, आदित्यचा जीव खरंच कुत्र्यांनी घेतला?
मुलीकडच्यांनी नवरदेवाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. नवरदेवाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं लोकांच्या लक्षात आलं. तो नववधूला जबरदस्तीनं घेऊन जाण्यासाठी हट्ट करू लागला. अनेकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणाचंच ऐकून घेत नव्हता. याची माहिती मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी लग्नस्थळ गाठून नवरदेवाला ताब्यात घेतलं आणि त्याला पोलीस ठाण्यात नेलं. या मुलाशी मुलीचं लग्न लावायचं नाही असा निर्णय मुलीच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी घेतला. लग्नासाठी केलेला खर्च मुलाच्या कुटुंबाकडून वसूल करण्यात येईल आणि ते पैसे तुम्हाला देण्यात येतील, असा शब्द पोलिसांनी मुलीकडच्यांना दिला.
मधुचंद्राच्या रात्री नववधूला कॉल; काही तासांनंतर २० किमीवर आढळला नवरदेवाचा निष्प्राण देह
जयमाला सुरू असताना नवरदेव विचित्र वागत होता, असं मुलीच्या वडिलांनी सांगितलं. तीन तास समजावल्यानंतरही तो ऐकला नाही. त्यामुळे पोलिसांना बोलवावं लागलं. या दरम्यान नवरदेव स्टेजवर चढून वेड्यासारखं वागत होता, काहीही बडबडत होता, असं मुलीच्या वडिलांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here