नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. करोनाचे सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर मी चाचणी केली. त्यानंतर माझा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे शहा यानी म्हटले आहे. माझी तब्येत ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला आयसोलेट करून घेऊन स्वत:ची करोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

करोनाविरोधातील लढाईचे मॉनिटर आहेत शहा

देशात विषाणूचा उद्रेक झाल्यापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सतत देशभरातील करोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राजधानी दिल्लीतील परिस्थितीचेही त्यांनी स्वत: लक्ष घालून परिस्थिती हाताळली होती. त्यांनी आतापर्यंत गृह आणि आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या बैठक आयोजित कर नियमितपणे कोविड-१९च्या ताज्या स्थितीचा आढावा घेत आले आहेत. लॉकडाउननंतर देशात अनलॉकची प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचना तयार करण्यामध्येही अमित शहा यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here