Crime News : गोंदियामध्ये लाचखोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनुदानाचे पैसे मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपये रोख आणि कोंबड्याचे जेवण मागणाऱ्या गोंदियामधील गोरेगाव पंचायत समितीच्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले आहे. जगदीश रहांगडाले असे या आरोपीचे नाव आहे. 

तक्रारदार याच्या वडिलांच्या नावाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 2021-22 मध्ये गुरांच्या गोठ्या बांधकामासाठी 77 हजार रुपये अनुदान मंजूर झाले होते. तक्रारदार यांनी गोठ्याचे बांधकाम पूर्ण केले असून हे बांधकाम आणि बांधकामाच्या बिलाची तपासणी करून बरोबर असल्याचा शेरा दिला. बिल मंजुरीसाठी आरोपी जगदीश याने तक्राराकडून आधी पाच हजार रुपये घेतले होते. त्यानंतर आणखी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दोन हजार रुपये आणि कोंबड्याचे जेवण देण्याचे ठरले. या मागणीनंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाला याबाबतची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर खातरजमा करून गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापला रचला आणि लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. या घटनेने गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

Crime News : असा रचला सापळा

तक्रारदाराने गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. गोरेगाव शहरापासून जवळच असलेल्या हिरड्यामाली येथील एका पान टपरीवर आरोपीला बोलविण्यात आले. यावेळी तक्रारदाराने त्याला मागणी केलेल्या लाचेची रक्कम घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर गोरेगाव पोलिस ठाण्यात गजदीश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण घटनेनंतर लाचलुचपत विभागाने संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून कसून चौकशी सुरू आहे.  

महत्वाच्या बातम्या 

news reels reels

Maharashtra Kesari : महिला कुस्तीपटूंसाठी खुशखबर! सांगलीत रंगणार महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here