शिर्डी : शेतकरी आणि ऊस तोडणी मजुराचा खरा मित्र म्हणजे बैल मात्र हाच बैल ऊस तोडणी मजूर असलेल्या त्याच्या मालकाचा वैरी ठरला असून बैलाने शिंगावर घेउन आपटल्याने वृद्ध इस्माचा दुदैवी मृत्यु झाला आहे. ऊस वाहतुकीसाठी असणाऱ्या बैलाने ऊस तोडणी कामगाराला शिंगावर उचलून जमिनीवर टाकल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव- कोळपेवाडी हद्दीतील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना बैलगाडी यार्डात सोमवारी (दि.१३) रात्री आठवाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दामू रंभा सपनार ( वय ५८, राहणार- नीरगाव, तालुका- सिन्नर, जिल्हा- नाशिक ) असे मृत उसतोडणी कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

उस तोडणी कामगार असलेले दामू सपनार सोमवारी सायंकाळी यार्डात होते. त्यावेळी त्यांच्यावर अचानक बैलाने हल्ला केला. बैलाने त्यांना शिंगावर उचलून घेत जमिनीवर टाकले. त्यात त्यांच्या डोक्याला मागच्या बाजूने गंभीर दुखापत झाली. त्यांना जखमी अवस्थेत स्थानिक डॉ. दत्तात्रय कोळपे यांच्या क्लिनिक येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांनंतर कोळपेवाडी ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
मुश्रीफ यांना दिलासा, उद्या होणार इडी कार्यालयात हजर; मागील दाराने पळाल्याचा आरोप
त्यांनंतर काही वेळाने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना मयत घोषित केले. दरम्यान शवविच्छेदनानंतर उशिरा सपनार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुणेकरांची चिंता वाढली, H3N2 चे २२ रुग्ण आढळले, ५ वर्षांखालील मुलांसाठी ठरतोय धोकादायक

हंगाम अवघा काही दिवसावर येवून ठेपला असतांना सपनार यांच्या दुर्दैवी मृत्यूने ऊसतोडणी कामगार व ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
तो मित्रांसोबत हॉटेलच्या खोलीत गेला, चेक आऊटनंतर पुन्हा एकटाच परतला, घडले धक्कादायक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here