फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यात रायायनिक द्रावण असलेले पिंप होते. आग लागल्यानंतर रासायनिक द्रावण ठेवलेल्या पिंपाचे स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आठ बंबांच्या सहायाने पाण्याचा मारा करुन रात्री पाऊणे नऊच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.
या ठिकाणी गाड्यांचे डेन्टीन्ग पेंटिंग करण्याचे देखील दुकान आहेत. त्यामुळे रंग, थिनर अशा साहित्यांमुळे आगीने अधिक भडका घेतला होता. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉटसर्किटमुळे लागली असल्याची शक्यता आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात दुकानाचे नुकसान झाले आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.
धायरी येथे लागलेल्या या आगीत विविध प्रकारचे (फर्निचर, वाहन दुरुस्ती, रंग स्प्रे बनवणे इत्यादी) ०६ छोटे कारखाने आगीत जळाले आहेत. तसेच २ दुचाकी व २ चारचाकी जळाल्या आहेत. पुणे व पीएमआरडीए कडील १० वाहनांच्या साह्याने जवानांनी आग पूर्णपणे विझवली असून आगीत कोणीही जखमी झालेले नाही. तसेच जिवितहानी टळली आहे.