नेमकं काय घडलं?
पोलीस चौकशीत आरोपी मोहितने पत्नी सपनावर आरोप केले आहेत आणि सांगितले की, होळीपूर्वी सपना कोणासोबत तरी निघून गेली होती. खूप शोधाशोध केली, पण ती सापडली नाही आणि २४ तासानंतर ती घरी परतली. अशा परिस्थितीत मोहितने सपनाला कुठे गेली असे विचारले असता तिने काहीच उत्तर दिले नाही. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा विवाद तेव्हा आणखी पेटला जेव्हा सपना अर्धनग्न अवस्थेत दुसऱ्या मजल्यावरून पायऱ्या उतरून खोलीच्या दिशेने आली. जेव्हाकी त्यांच्या घराचं बाथरुम हे खालच्याच मजल्यावर होतं.
पत्नीला अर्धनग्न अवस्थेत पाहून मोहित संतापला
ते पाहताच मोहितने आक्षेप घेतला. यावरून पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर मोहितला खूप राग आला आणि रागाच्या भरात त्याने जवळच ठेवलेल्या धारदार शस्त्राने सपनाच्या डोक्यावर आणि छातीवर अनेक वार केले.
घटनेनंतर हत्येसाठी वापरलेले हत्यार घराच्या बाथरूममध्ये फेकून आरोपी पती मोहित हा घराच्या गेटवर येऊन बसला. त्याने अर्धनग्न अवस्थेतील पत्नीचा रक्ताने माखलेला मृतदेह घरात टाकून दिला. घरातून आरडाओरडा झाल्याचं ऐकून स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली. जेव्हा ते घरात गेले तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला. सध्या या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.