आता अभिषेक बच्चनने यासंबंधी ट्वीट करत वडिलांना इस्पितळातून घरी सोडण्यात आल्याचे सांगितले आहे. अभिषेकने ट्वीट करत म्हटलं की, ‘माझ्या बाबांची करोनाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांचे आणि शुभेच्छांचे मनापासून आभार.’ दरम्यान, अभिषेकचा करोना रिपोर्ट अजूनही पॉझिटिव्ह असल्यामुळे तो पुढील काही दिवस इस्पितळातच राहणार आहे.
२७ जुलै रोजी आणि तिची मुलगी यांच्या करोनाच्या टेस्टही निगेटीव्ह आल्या होत्या. यानंतर त्यांनाही घरी पाठवण्यात आले होते. जया बच्चन यांना करोनाची लागण झाली नव्हती. त्यांचा रिपोर्ट याआधीच निगेटिव्ह आला होता.
काही दिवसांपूर्वी अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. स्वतः अमिताभ आणि अभिषेक यांनी यासंबंधी माहिती सोशल मीडियावर दिली होती. दरम्यान, १७ जुलै रोजी ऐश्वर्या आणि आराध्याला नानावटीमध्ये भरती करण्यात आले होते. तर ११ जुलै रोजू अमिताभ बच्चन आणि
करोना पॉझिटिव्ह असल्याचं कळलं होतं.
या दोघांनंतर १२ जुलैला ऐश्वर्या आणि आराध्याचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले होते.अमिताभ आणि अभिषेक यांना करोना झाल्यावर ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आले होते. घरात क्वारंटाइन असताना ऐश्वर्या रायला ताप आला आणि त्यानंतर तिच्यासहीत आराध्यालाही नानावटी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Like!! Thank you for publishing this awesome article.