अहमदाबाद: ‘भारतीय संघासाठी मी भरीव योगदान देऊन बराच मोठा कालावधी लोटला होता. ही बाब मला खूप त्रास देत होती. शतकी कामगिरीच्या अपेक्षांचे ओझे मीच वाढवून घेतले होते’, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने हा मनमोकळा संवाद साधला तो प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी. अन् निमित्त होते बीसीसीआय वेबसाइटच्या छोटेखानी मुलाखतीचे.

मोठी खेळी करण्याच्या अपेक्षांचे ओझे आपण स्वतःच मानगुटीवर बसवून घेतले होते असेही विराटने खुल्यादिलाने मान्य केले. या दिल्लीकर फलंदाजाने गावस्कर-बॉर्डर मालिकेतील चौथ्या अहमदाबाद कसोटीत १८६ धावांची खेळी करत तीन वर्षांचा कसोटीशतकाचा दुष्काळही संपुष्टात आणला. ‘प्रामाणिकपणे सांगायचे माझ्याच कमकुवत दुव्यांनी कामगिरी झाली नव्हती अन् यामुळे मनातली गुंतागूंत वाढत गेली. शतकाची आस प्रत्येक फलंदाजाला असते; कारण शतकी कामगिरी फलंदाजाला समृद्ध करत असते. मी मात्र याचा बागुलबुवा करून ठेवला होता. अर्थात या भावनेची दुसरी बाजू अशी की, मी काही ४०, ४५ धावांच्या खेळींवर समाधान मानणारा फलंदाज नव्हे. संघासाठी भरीव योगदान देणे मला कायमच भूषणावह वाटत आले आहे. मी ४० धावांवर फलंदाजी करत असेन तर माझ्याकडून दीडशे धावा तरी होतील, असा आत्मविश्वास वाटत असतो’, आपल्या लाडक्या फलंदाजांपैकी एक, द्रविडच समोर असल्याने विराट अधिक खुलला.

IPLमुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली; द्रविड यांनीही चिंता व्यक्त केली, तर रोहित म्हणाला…
शतकाच्या दुष्काळाचा काळ किती कठीण होता? या प्रश्नावर विराट म्हणतो, ‘खूप वाईट… हॉटेलरूमच्या बाहेर पडलात की, समोर दिसणारी पहिली व्यक्ती तुमचे शतक कधी होणार अशी आपुलकीने चौकशी करते. मग लिफ्टमधील व्यक्ती, बसचालक असे सगळ्यांनाच माझ्या शतकाची आस असते. यामुळे शतकाचा विचार सतत डोक्यात सुरू असतो. मात्र खेळाडू म्हणून मुरलात की आव्हानांचा सामना करण्याचे मार्ग मिळतातच’. अहमदाबादमधील शतकी खेळीदरम्यान विराटने खेळपट्टीवर साडेआठ तास किस्सा लढविला हे विशेष. सहाजिकच ७५व्या आंतरराष्ट्रीय शतकाची गोडी आगळीच ठरली.

Thank You ‘केन मामा’! भारताला पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी देणारा स्टार
जेव्हा द्रविडही आतुर होतात!

विराटच्या खणखणीत शतकी खेळीसाठी द्रविडही आतुर होते. अर्थात त्यांनी याआधीही विराटची शतके पाहिली आहेत, पण हे खास होते. याचे कारण ते स्वतःच सांगतात. ‘याआधीची विराटची शतके मी टीव्हीवर पाहिली होती. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सुत्रे मी हाती घेऊन आता १५, १६ महिन्यांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे मी विराटचे कसोटी शतक पाहण्यात आतुर झालो होतो. यावेळी त्याचे शतक ड्रेसिंगरूममधून पाहिले जे मला खास वाटले’, असे सांगताना द्रविड हे विराटला गंमतीने म्हणतात की, ‘तू मला खूप प्रतीक्षा करायला लावलीस’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here