Ethanol : सध्या केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला (Ethanol Production) प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे इथेनॉलच्या उत्पादनात वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, 2021-22 या वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने (Blending of ethanol in petrol) सुमारे 2 हजार 341 कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे. याबाबतची माहिती ऊर्जामंत्री आर के सिंह (R. K. Singh) यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.  देशात सध्याची वार्षिक इथेनॉल उत्पादन क्षमता अंदाजे एक हजार 37 कोटी लिटर आहे.

Biogas : बायोगॅस उद्योगातही 85 हजार नोकऱ्या निर्माण

दरम्यान, अक्षय ऊर्जा आणि रोजगार वार्षिक समीक्षा 2022 नुसार बायोगॅस उद्योगातही 85 हजार नोकऱ्या निर्माण झाल्या असल्याची माहिती आर के सिंह यांनी दिली. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचे 2030 पर्यंत सुमारे एक लाख कोटी रुपयांची आयात बचत आणि सुमारे सहा लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे सिंह यावेळी म्हणाले.

Ethanol Production : इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारचा प्रोत्साहन 

इथेनॉलचा प्रभावी वापर करण्याबाबत केंद्राने केलेल्या नियोजनामुळे इथेनॉलची ( Ethanol) वार्षिक उत्पादनक्षमता वाढली आहे. मागील वर्षी सरकारने देशातील विविध पिकांवर चालणाऱ्या 288 इथेनॉल प्रकल्पांना 18 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांनी मंजूर केले होते. मोलॅसिस आधारित प्रकल्पाची क्षमता 619 कोटी लिटर तर धान्यावर आधारित इथेनॉल प्रकल्पांची क्षमता 328 कोटी लिटरची आहे. यावर्षी तेल उत्पादक कंपन्या जास्तीत जास्त प्रमाणात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. या दृष्टीने त्यांनी ऊस आणि अन्य धान्यांवर आधारित इथेनॉल प्रकल्पाकडेही सातत्याने इथेनॉलची मागणी नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

मका आणि तांदळापासूनही इथेनॉल निर्मिती

अतिरिक्त साखरेच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सरकार साखर कारखान्यांना अतिरिक्त ऊस इथेनॉल निर्मितीकडे (Ethanol production) वळवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. कृषी अर्थव्यवस्थेला चालना देणे, आयातित जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे, कच्च्या तेलाच्या आयात बिलामुळे परकीय चलनाची बचत करणे आणि वायू प्रदूषण कमी करणे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दरम्यान, गेल्या 8 वर्षात इथेनॉल उत्पादन क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. इंधन म्हणून वापरता येण्याजोग्या इथेनॉलची निर्मिती वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी भारतीय अन्न महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या मका आणि तांदळापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना प्रोत्साहन देत आहे. सरकारने भारतीय अन्न महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या मका आणि तांदळापासून तयार केलेल्या इथेनॉलची किंमतही निश्चित केली आहे. 

news reels Reels

महत्त्वाच्या बातम्या:

Ethanol production : मागील 8 वर्षात इथेनॉल उत्पादनात मोठी वाढ, पाहा किती झालं उत्पादन?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here