मुंबई : स्वप्ननगरी मुंबई आपलं एक घर असावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं, पण ते प्रत्येकाला शक्य होत नाही. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात घर खरेदी करण्यासाठी आजच्या काळात तगडी रक्कम मोजावी लागत आहे. मुंबईतील घरांच्या महागड्या व्यवहारांबाबत तुम्ही ऐकलं असेलच. कोट्यवधी रुपयात येथे अनेक धनाढ्य लोक आलिशान फ्लॅट आपल्या खरेदी करत आहे. आणि आता पुन्हा असाच एक व्यवहार समोर आला आहे. मायानगरी मुंबईतील एक आलिशान ट्रिपलेक्स प्लॅटचा तब्बल २५२ कोटी रुपयात व्यवहार झाला आहे. देशातील हा सर्वात महागडा घर खरेदी करार असल्याचे बोलले जात आहे.

दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर या उच्चभ्रू भागात एक बांधकामाधीन असलेल्या इमारतीत हा करार झाला असून हा फ्लॅट १८ हजार स्क्वेअर फूट एवढा मोठा आहे. रिअल इस्टेटच्या सूत्रांनुसार उद्योगपती नीरज बजाज आणि मॅक्रोटेक डेव्हलपर्स (लोढा ग्रुप) यांच्यात हा व्यवहार झाला आहे.

‘ब्रिक्सचेन’ रियल इस्टेटमधील गुंतवणुकीतला ‘गेमचेंजर’, रियल इस्टेट क्षेत्रातील पहिल्या स्टार्टअपचे लोकार्पण
मुंबईतील महागडा रिअल इस्टेट व्यवहार
गेल्या महिन्यातच वेलस्पन समूहाचे अध्यक्ष उद्योगपती बी. के. गोयंका यांनी मुंबईच्या वरळी भागात एक ३० हजार स्क्वेअर फुटांचे पेंटहाऊस तब्बल २४० कोटी रुपयांना विकत घेतले होते. ज्याला त्यावेळी सर्वात मोठा करार म्हटले गेले होते. मात्र, आता महिनाभरानंतर बजाज आणि लोढा ग्रुपने मिळून मायानगरी मुंबईत मोठा व्यवहार केला आहे. गेल्या महिन्यात पेंटहाऊसचा करार टर्नकी इमारतीत झाला होता, तर मार्च महिन्यातील सध्याचा करार हा बांधकामाधीन इमारतीचा असून याचे काम नुकतेच सुरू झाले आहे.

बजाज समूहाच्या संचालकांनी लोढा मलबार टॉवरचे वरचे तीन मजले बुक केले असून ही इमारत राजभवनाच्या जवळ असल्याचे बोलले जात आहे. या फ्लॅटची किंमत १.४ लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट असून या सदनिकेसाठी उद्योजक बजाज यांनी टोकन मनी दिल्याची माहिती समोर आली आहे, तर उर्वरित रक्कम इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाल्यानंतर दिली जाणार जाईल, असे समजले जात आहे.

भारतातील सर्वात मोठा घर खरेदीचा व्यवहार; मुंबईत १२०० कोटींना विकले २३ फ्लॅट, मालक कोण आहे माहितेय का?
इमारतीचे काम नुकतेच सुरू झाले
मलबार हिल येथे बांधकामाधीन असलेल्या या ३१ मजली इमारतीचे बांधकाम नुकतेच सुरू झाले असून ही इमारत २०२६ मध्ये पूर्णपणे होईल. उद्योगपती बजाज यांनी टॉवरमध्ये २९वा, ३०वा आणि ३१वा मजला आपल्या नावे खरेदी केला आहे. यासोबतच त्यांनी ८ पार्किंगच्या जागाही विकत घेतल्या आहेत. सध्या, बजाज कुटुंब मुंबईच्या पेडर रॉड येथील माउंट युनिक बिल्डिंगमध्ये वरच्या दोन मजल्यावर राहतात. नवीन टॉवरमुळे बजाज कुटुंबाला खाजगी छत मिळेल, जिथे स्विमिंग पूल देखील असेल. इंडेक्सटॅप डॉट कॉमच्या माहितीनुसार, सोमवारी हा सौदा नोंदवण्यात आला, ज्यासाठी १५ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे.

Mumbai : भारतातील सर्वात महागडी डील, वरळीत २४० कोटीत खरेदी केलं आलिशान पेंटहाउस
घर खरेदीसाठी झुंबड
मुंबईत आलिशान घरे खरेदी करू इच्छिणाऱ्या लोकांमध्ये सध्या चांगलीच स्पर्धा असल्याचे प्रॉपर्टी मार्केटच्या तज्ज्ञांचे मत आहे. मार्चअखेर आधी डील फायनल करण्यात सगळेच व्यस्त आहेत कारण एप्रिल महिन्यापासून कलम ५४ अंतर्गत भांडवली नफा गुंतवावा लागेल, ज्याची मर्यादा शून्य ते १० कोटी आहे. यावरील रकमेवर आपोआप कर आकारला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here