Maharashtra Politics News | शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. आम्ही पवारांना नेहमी घाबरून राहतो, ते कधी काय करतील याचा नेम नसतो, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

हायलाइट्स:
- लग्नमंडपात गुलाबराव पाटलांची फटकेबाजी
- गुलाबराव पाटील मंगळवारी लग्नात वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी गेले होते
मंत्री गुलाबराब पाटील आपल्या बोलण्याच्या शैलीने अनेकांची कोंडी करतात तशीच अनेकांची मनेही जिंकतात. जळगाव जिल्हातील त्यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात गुलाबराव पाटील मंगळवारी लग्नात वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी गेले होते. यावेळी वधू ही पवार नाव असलेल्या कुटुंबातील असल्याने गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणावेळी राजकीय फटेकबाजी करुन कार्यक्रमाला एकच रंगत आणली.
गुलाबराव पाटलांनी गायली कव्वाली
काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये एका कार्यक्रमात कव्वाली सादर करुन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. ‘चढता सूरज धीरे धीरे’ ही कव्वाली गायला सुरुवात केल्यानंतर गुलाबराव एक-दोन ओळी गाऊन जागेवर बसतील, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र, गुलाबरावांनी संपूर्ण कव्वाली गायली. या कव्वालीतील एकूण एक शब्द आणि गाण्यातील प्रत्येक हरकत, तान गुलाबराव पाटील यांना माहिती होती. राजकारणापलीकडील गुलाबराव पाटील यांचे हे कौशल्य पाहून उपस्थित श्रोते अवाक झाले होते.
५० खोके, नागालँड ओक्के? गुलाबरावांनी डिवचलं, अजितदादा संतापले; मुख्यमंत्र्यांनीही फिरकी घेतली
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.