नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून देशांतर्गत शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. जागतिक संकेतांसह अनके घडामोडींनी बाजाराच्या वाटचालीवर प्रभाव पाडला आहे.या सत्रात गेल्या सलग चार दिवसांपासून शेअर बाजार घसरला आहे. यामुळे अनेक हेवीवेट समभागांनी ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली असून यामध्ये अनेक लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपन्यांचा समावेश आहे. लार्ज कॅप आणि मिड कॅप विभागातील किमान १४ बड्या कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत.

बाजाराच्या आकडेवारीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज, पेज इंडस्ट्रीज, सिप्ला, लॉरस लॅब्स, ग्लँड फार्मा, बायोकॉन, क्रॉम्प्टन ग्रीव्स कंज्यूमर इलेक्ट्रिकल्स, मुथूट फाइनेंस, मोटेलवाल ओएस फाइनेंशियल सर्व्हिसेस, रिलैक्सो फुटवेअर्स, इप्का लेबोरेटरीज, जिलेट इंडिया, बायर क्रॉपसायन्स आणि टाटा कंझ्युमरसारखे लोकप्रिय शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर घसरले आहेत. मात्र, परवडणाऱ्या दरात उपलब्ध असलेल्या या दर्जेदार स्टॉकबाबत गुंतवणूकदार विचार करू शकतात, असे बाजार तज्ज्ञांचे मत आहे. वाढती चलनवाढ, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FIIs) सतत होणारा बाहेरचा प्रवाह आणि सिलिकॉन व्हॅली बँकेतील अलीकडील आर्थिक संकट यांसह अनेक घटकांनी शेअर बाजारातील भावनांवर प्रभाव टाकला आहे.

देर आए दुरुस्त आए! अदानी शेअरचे छप्परफ़ाड रिटर्न, १ लाख रुपये गुंतवल्यावर मिळाला इतक्या कोटींचा परतावा
रिलायन्समध्ये बंपर कमाईची संधी
देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स मंगळवारी ०.३७ टक्के घसरून २,२७६.५० रुपयांवर क्लोज झाले असून दिवसभरात स्टॉक २,२६९.६५ रुपयांवर घसरला, जो ५२ आठवड्यांचा नीचांक आहे. अशा स्थितीत अनेक मोठे स्टॉक्स आता स्वस्त दरात खरेदीसाठी उपलब्ध असून यासह मिडकॅप समभागांमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. इक्वोनॉमिक्स रिसर्च अँड अॅडव्हायझरीचे संस्थापक जी चोक्कलिंगम, रिलायन्सच्या स्टॉकबद्दल म्हणतात की स्टॉक पुढील चार वर्षे तेजीत राहणे अपेक्षित आहे. त्यांनी म्हटले की, रिलायन्स एक छोटी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. कंपनी टेलिकॉम, रिटेल आणि रिन्युएबल एनर्जी सेगमेंटमध्ये मूल्य अनलॉक करू शकते. यामुळे पुढील चार वर्षांत हा शेअर गुंतवणूकदारांना सतत चांगला परतावा देऊ शकतो.

गुंतवणूकदारांना मोठा नफा! टाटांचा ऑटो शेअर घेणार मोठी उसळी, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला
त्याचप्रमाणे क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स ३६३ रुपयांपर्यंत वाढण्याचे अपेक्षित असून स्टॉक मंगळवारी २८८.६० रुपयांवर क्लोज झाला होता. निफ्टी ५० मध्ये समाविष्ट १६ समभाग सध्या त्यांच्या दीर्घकालीन मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर व्यवहार करत आहेत. यामध्ये आयटीसी, L&T, महिंद्रा अँड महिंद्रा, ॲक्सिस बँक, सन फार्म, आणि NTPC यांचा समावेश असून हे शेअर्स पडले तर गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी करण्याचा विचार करावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

(नोट : तज्ञांनी दिलेल्या शिफारशी, सूचना, मते आणि मते ही त्यांची स्वतःची आहे आणि ती MaTa ची नाही. येथे दिलेली माहिती केवळ स्टॉकच्या कामगिरीबद्दल असून तो गुंतवणुकीचा सल्ला मानला जाऊ नये. शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखमीच्या अधीन असते त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here