छत्रपती संभाजीनगर : दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या ४० वर्षीय महिलेचा विद्यापीठ परिसरातील साई संस्थेजवळ निर्मनुष्य ठिकाणी मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी छावणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून हा आत्महत्येचा प्रकार आहे की आणखी काही, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. अनिता कचरू दाभाडे वय -४० (रा.भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) असं मृत महिलेचं नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अनिता या पती, मुलगा व मुलींसह भावसिंगपुरा भागात वास्तव्यास होत्या. त्या सोमवारपासून घरातून बाहेर गेल्या होत्या. मात्र परत घरी आल्याच नाही. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी काही नागरिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठतील साईसंस्थेच्या परिसरातून जात असताना निर्मनुष्य ठिकाणी एका कोपऱ्यात एक महिला बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

मुंबई हादरली! लालबागमध्ये कपाटात प्लॅस्टिकच्या पिशवीत आढळले महिलेचे शव, पोलिसांकडून मोठी माहिती उघड

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्धास्थेतील महिलेला रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासून अनिता यांना मृत घोषित केले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, अनिता या निर्जनस्थळी का गेल्या होत्या, त्यांनी आत्महत्या केली की मग अजून काही घडले, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here