मुंबई : दिंडोशीमध्ये मंगळवारी पहाटे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक नर बिबट्या जेरबंद झाला. वन अधिकार्यांनी आधीच टॅग केलेल्या बिबट्याला पुन्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं आहे. या बिबट्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याने तपासणीनंतर बिबट्याला पुन्हा जंगलात सोडलं जाण्याची शक्यता आहे.
पाळीव कोंबड्यांसारखी शिकार शोधत बिबट्या दिंडोशीच्या दिशेने आला असावा, अशी शक्यता वन्यजीव वॉर्डन आणि रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेलफेअरचे प्रमुख पवन शर्मा यांनी सांगितलं. शर्मा यांनी सांगितलं, की बिबट्याने कोणालाही इजा केली नसली किंवा बिबट्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तरी दिंडोशी येथील स्थानिक नागरिकांनी पिंजरा लावण्यासाठी वन अधिकाऱ्यांवर खूप दबाव आणला होता. त्यामुळे वनविभागाकडून या परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. प्रेमापायी रुद्राशी भिडला, तुंबळ युद्ध केले, माया वाघिणीचे मन जिंकत अखेर बलरामने बाजी मारलीच अखेर मंगळवारी पहाटे बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या नागरिकांनी अखेर सुटकेचा श्वास सोडला.