बुलंदशहर : देशात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना आता उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे बुलंदशहरात एक जोडपं रात्री आपल्या अंगणात झोपलं होतं. यावेळी असं काही घडलं की यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पतीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नी रात्रीच्या वेळी आपल्या अंगणात झोपले असताना त्यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मुंबई हादरली! लालबागमध्ये कपाटात प्लॅस्टिकच्या पिशवीत आढळले महिलेचे शव, पोलिसांकडून मोठी माहिती उघड
पैशांच्या देवाण-घेवाणीवरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर पोलीस पुढील तपास करत आहेत. मंगळवारी रात्री शिकारपूरच्या लाल दरवाजा परिसरात ही घटना घडली. इथे शब्बीर (४२)आणि रिहाना (४०)हे दोघे पती-पत्नी घराच्या अंगणात झोपले होते तर घराच्या आतमध्ये त्यांची मुलं झोपली होती. रात्री अचानक काही अज्ञातांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केली. यामध्ये रिहाना यांचा जागीच मृत्यू झाला तर शब्बीर गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर शब्बीर यांनी आरडाओरड केली. यामुळे शेजारी आणि घरातील मुलांना जाग आली. लोकांनी धावत घटनास्थळा गाठलं असतान त्यांना रिहाना या रक्ताच्या थारोळ्यात दिसल्या तर शब्बीरदेखील रक्ताने माखले होते. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत रिहानाचा मृत्यू झाला होता तर शब्बीरवर उपचार सुरू आहेत.

Crime Diary : रिप्लाय नाही दिला तर मारेन, सुसाईड नोटही रागात लिहली की पेनाची निब तुटली; मृत्यूचं भयानक गुढ
पोलिसांनी या घटनेविराधोत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. यामध्ये शब्बीर यांच्या मुलांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांआधी वडिलांचा पैशांवरून काही लोकांशी वाद झाला होता. त्यामुळे ही हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर पुढील तपास सुरू आहे.

पतीचा बायकोवरील राग पुणेकरांना पडला महागात, पोलिसांत घटस्फोटासाठी तक्रार दिल्याने काय केलं तुम्हीच पाहा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here