नवी दिल्ली: (Jyotoraditya Scindia) यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर, तसेच (Sachin Pilot) यांनी बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसचे खासदार () यांनी पक्षाला आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता त्यावरून त्यांना समजाणाऱ्या नेत्यांना त्यांनी शायरीच्या माध्यमातून हल्ला केला आहे. या बाबत केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या ‘सब्र के इम्तिहान’बाबत (संयमाची परीक्षा) भाष्य केले आहे. कॉंग्रेसच्या व्हर्च्युअल बैठकीत पक्षाला आत्मपरीक्षण सुरू करण्याबाबत सांगणारे राजीव सातव ट्विटमध्ये म्हणतात, ‘मत पूछ मेरे सब्र की इन्तेहा कहां तक है, तू सितम कर ले, तेरी ताक़त जहां तक है, व़फा की उम्मीद जिन्हें होगी, उन्हें होगी, हमें तो देखना है, तू ज़ालिम कहां तक है.’

शनिवारी राजीव सातव यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाकडे इशारा करत अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. त्यांनी लिहिले…

माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी राजीव सातव यांच्या आत्मपरीक्षणाच्या सल्ल्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते ट्विटमध्ये लिहितात, ‘२००४ ते २०१४ पर्यंत १० वर्षे भारतीय जनता पक्ष सत्तेबाहेर राहिला. परंतु त्यांनी अटलबिहारी वाजपेयी किंवा त्यांच्या सरकारला त्या काळाच्या परिस्थितीसाठी कधीही जबाबदार धरले नाही. दुर्दैवाने काही कॉंग्रेसमधील लोक राष्ट्रीय लोकशाही आघाडी (आलोआ) आणि भाजपशी लढा देण्याऐवजी डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. ऐक्याची आवश्यकता असताना ते विभाजन करत आहेत.’

दुसरीकडे, कॉंग्रेस नेत्यांच्या ट्विटरवॉरवर पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी रविवारी पत्रकार परिषदेत भाष्य केले. ट्विटर-ट्विटर खेळू नका, मित्रांनो. एक होऊन मोदी सरकारविरोधात आवाज उठवा, अशा शब्दात सुरजेवाला यांनी काँग्रेस नेत्यांना आवाहन केले आहे.

त्यानंतर तिवारी यांना माजी खासदार मिलिंद देवडा यांनी उत्तर दिले. त्यानंतर वाद वाढला. कॉंग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा म्हणाले, “मनीष, अगदी बरोबर सांगितले. इतिहास माझ्यासाठी उदार होईल, असे सन २०१४ मध्ये पंतप्रधानपद सोडताना डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते. त्यांच्याच पक्षाचे काही लोक त्यांची अनेक वर्षांची सेवा नाकारतील आणि त्यांच्या वारशाला नुकसान पोहोचवतील याची त्यांनी कल्पना तरी केली असेल का?… आणि तेही त्यांच्या उपस्थितीत…’

वाचा:

या बरोबरच दुसरे माजी केंद्रीय मंत्री, यांनी तिवारी आणि देवरा यांच्यावर टीका केली आहे. दुर्दैवाने यूपीएची दहा वर्षे कलंकित करण्यात आली असल्याचे थरूर म्हणाले. आपल्या पराभवातून बर्‍याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि काँग्रेसला पुन्हा जिवंत करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. परंतु, जर आपले वैचारिक शत्रूच्या मनाप्रमाणे चालल्यास असे होऊ शकत नाही, असे थरूर म्हणाले.

वाचा:

राजीव सातव यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि पी. चिदंबरम या ज्येष्ठ नेत्यांना आत्मचिंतनाचा सल्ला दिल्यानंतर हा वाद सुरू झाला. तुम्ही सर्वजण म्हणत आहात की आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, मात्र ती घरापासून सुरू झाली पाहिजे. २००९ मध्ये आपण २०० हून अधिक होतो, ते ४४ वर कसे आले?, त्यावेळी तुम्ही सर्व मंत्री होतात. तुम्ही नेमके कोठे अयशस्वी ठरलात हे देखील पाहिले पाहिजे, असेही सातव यांनी म्हटले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here