Maharashtra Assembly Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. त्यांनी शेतकरी योजनांची खिल्ली उडवणाऱ्या विरोधकांना सुनावले.

 

Maharashta budget session
विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन

हायलाइट्स:

  • पीक जेव्हा अवकाळी पावसात नष्ट होतं, तेव्हा त्याच्याकडे पैसे नसतात
  • त्याच्याकडे नवे बियाणे खरेदी करायलाही पैसे नसतात
मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेवर विरोधकांकडून सुरु असलेल्या टीकेला अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रत्युत्तर दिले. यापूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरु केली तेव्हा विरोधकांनी खिल्ली उडविली होती. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळणार होते. त्यावर विरोधकांनी शेतकऱ्यांना दिवसाला आणि तासाला किती पैसे मिळणार, असे सवाल उपस्थित करत त्या योजनेची खिल्ली उडवली. आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेबाबत राज्यातील विरोधक हे केंद्रातील त्यांच्याच नेत्यांचा कित्ता गिरवत आहेत. तुम्ही आता जी चूक करताय तीच चूक तुमच्या केंद्रीय नेत्यांनीही केली होती. पण २०१९ च्या निवडणुकीत विरोधकांचा सफाया झाला त्यावेळी मात्र विरोधी पक्षातील हेच नेते पराभवाची कारणं देताना मोदी सरकारने ६ हजार दिल्याने शेतकऱ्यांवर परिणाम झाला, असे सांगत होते, हा मुद्दा अधोरेखित करत फडणवीसांनी विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ते बुधवारी सभागृहात अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलत होते.

यावेळी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्मान योजनेचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. आपल्यापैकी अनेक लोकं जेव्हा हॉटेलमध्ये जातात तेव्हा आपण १० हजार रुपयांचं बिल देतो. एखाद्या शेतकऱ्याने कष्ट करुन उगवलेलं पीक जेव्हा अवकाळी पावसात नष्ट होतं, तेव्हा अगोदर झालेल्या सगळ्या खर्चामुळे त्याच्याकडे पैसे उरलेले नसतात. त्याच्याकडे नवे बियाणे खरेदी करायलाही पैसे नसतात. तेव्हा ही ६ हजार रुपयांची मामुली समजली जाणारी रक्कम कामी येते. आता केंद्राचे सहा आणि राज्याचे सहा असे मिळून शेतकऱ्यांना १२ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. ही मदत सध्या फार मोठी नसली तरी भविष्यात ती वाढू शकते. मदतीच्या रक्कमेचा आकडा कमी किंवा जास्त हा मुद्दा नाही, याची सुरुवात होणे महत्वाचे होते. ती तुम्ही केली नाहीत आणि आम्ही ती सुरुवात केली, असे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सांगितले.
Ajit Pawar: मंत्री सभागृहात गैरहजर, लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ; अजित पवारांच्या संतापाचा पारा चढला

बघा मी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं पटकन ऐकतो: फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु असताना शेजारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. फडणवीस जेव्हा शेतकऱ्यांसाठीच्या योजनेवर बोलायला लागले तेव्हा मुख्यमंत्री शिंदे बसल्याजागेवरूनच बोलले. ‘मी त्यावेळी शेतकऱ्यांसाठी योजना सुरु करा’, असे सांगितले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ‘आताचे मुख्यमंत्री जेव्हा तुमच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा तुम्ही त्यांचं ऐकलं नाही. मी बघा कसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पटकन ऐकतो’ असे देवेंद्र फडणवीसांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण २१ हजारांची मदत: देवेंद्र फडणवीस

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या योजना कशा फायदेशीर ठरतील, हे पटवून देण्याचा प्रयत्न अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आपण गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजना आणि विदर्भ,मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी थेट अनुदानाची योजना सुरु केली आहे. या सगळ्यामुळे एखाद्या शेतकरी कुटुंबाला पीएम किसान योजनेचे ६०००, नमो शेतकरी महासन्मान योजनेचे ६००० आणि थेट अनुदान योजनेतंर्गत ९००० असे मिळून तब्बल २१ हजार रुपये शेतकऱ्यांच्या घरात जातील, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here