Maharashtra Heavy Rainfall Alert Today to 7 Districts Including Pune; Weather Alert: राज्यात पुढच्या ३-४ तासांत मेघगर्जनेसह पाऊस, पुण्यासह ७ जिल्ह्यांना IMD चा इशारा
मुंबई : राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशात आता हवामान खात्याकडून पुढच्या ३ ते ४ तासांसाठी राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर पुढचे काही दिवस राज्यात असेच हवामान असेल, अशीही माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ तारखेला म्हणजेच आज हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वारा वाहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी पुढील ३-४ तासांत धुवांधार पाऊस होईल. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, असा इशारा आयएमडी मुंबईकडून देण्यात आला आहे. Weather Forecast: राज्यात ५ दिवस मुसळधार पाऊस, पुण्यासह ‘या’ ४ जिल्ह्यांना IMD कडून ऑरेंज अलर्ट दरम्यान, राज्यात पुढचे ५ दिवस पावसाचे असणार आहेत. यामुळे अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १५ मार्च ते १८ मार्चपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपीटी पडण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर यावेळी वाऱ्याचा वेगळी जास्त असेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, पालघर, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे सोडले तर संपूर्ण राज्यात पाऊस होईल. अशात उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या ५ दिवसांत मेघगर्जनेसह गारपीटही होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १६ तारखेला राज्यातील ४ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे. यामध्ये पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. इथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी मुंबई ते गडचिरोली आणि कोल्हापूर ते नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.