अन्सारी पाकिस्तानी नागरिक असून तो शहरात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती विशेष शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. तपासाअंती त्याला भवानी पेठेतील चुडामण तालीम चौक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली असता त्याच्याकडे भारतीय पारपत्र आढळून आले.
अन्सारीने बनावट कागपत्रांद्वारे भारतीय पारपत्र मिळवून बेकायदा वास्तव्य केल्याचे तपासात आढळून आले. याबाबत आता पोलीस सतर्क झाले असून परिसरात चौकशी सुरू करत आहेत. त्याच्या वास्तव्याचे नेमके कारण काय होते, हे त्या तरुणांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
अन्सारीचा बेकायदा वास्तव्य करण्यामागचा हेतू काय होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. त्याने दुबई ते पुणे प्रवास केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. खडक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश तटकरे तपास करीत आहेत.
शीतल म्हात्रेंचा व्हिडिओ व्हायरल, कल्याणचा तरुण ताब्यात; उद्धव ठाकरे गटाचं पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन