tampered with ambabai idol, Kolhapur Breaking: पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाई मूर्तीशी छेडछाड; श्री पूजकांचा गंभीर आरोप – officials of central archeology department tampered with ambabai idol pujaks lawyer gandhi makes serious allegation
कोल्हापूर: साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली होती, यानंतर राज्य पुरातत्व विभागाच्या वतीने मूर्तीची पाहणी करण्यात आली. त्यानंतर गेल्या मंगळवारी केंद्रीय पुरातत्व खाते देखील कोल्हापुरात येत अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी केली. दरम्यान मूर्तीची पाहणी करताना मूर्तीची छेडछाड झाल्याचा आरोप श्री पूजकांच्या वकिलांनी केला आहे. चेहऱ्यावरील लेपचा काही थर काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचे श्रीपूजकांच्या वकिलांनी म्हटले आहे. या संदर्भात देवीच्या मूर्तीचे दोन छायाचित्र देखील कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती नाजूक अवस्थेत असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली होती. दरम्यान यावेळी मूर्तीच्या काही भागांना देखील इजा झाल्याचेही समोर आले होते. तर मूर्ती संवर्धन प्रक्रियेवर देखील शंका निर्माण करण्यात आली होती. दरम्यान याची तत्काळ गंभीर दखल घेत राज्य पुरतत्व खात्याने अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी केली आणि अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. यानंतर पुन्हा गेल्या मंगळवारी केंद्रीय पुरातत्व खात्याने ही अंबाबाई मंदिरात येत मूर्तीची पाहणी केली. यावेळी मूर्ती बरोबर छेडछाड झाल्याचा आरोप श्री पूजाकांच्या वकिलांनी केला आहे. LLC Masters 2023: निवृत्तीनंतर कोण असं खेळतं? बॅटिंग पाहून पाकिस्तानी गोलंदाजांनी हात जोडले श्री पूजक गजानन मुनीश्वर यांनी मूर्ती संवर्धन प्रक्रिया बाबत कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली यावेळी श्रीपूजकांच्या वकिलांनी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने छेडछाड केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच कोणत्याही परवानगीशिवाय चेहऱ्यावरील यापूर्वी लावलेला लेप चा काही थर देखील काढून टाकल्या असून यामुळे मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केंद्रीय पुरातत्त्व खात्यावर केला आहे. यामुळे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कृत्य केल्याचा श्रीपूजकांच्या वकिलांचा दावा आहे. यामुळे या संपूर्ण मूर्ती संवर्धन प्रक्रियेत मोठा वाद होण्याची चिन्ह निर्माण झाले आहेत.
मेडिक्लेमची रक्कम मिळण्यासाठी रुग्णालयात अॅडमिट होण्याची गरज नाही; कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीचे झीज झाल्याचे समोर आले यानंतर राज्य पुरातत्त्व विभागाकडून २८ फेब्रुवारी रोजी मूर्तीची पाहणी करण्यात आली. यानंतर केंद्रीय पुरातत्व विभागाला देखील पत्र पाठवण्यात आले होते. यात पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्रीमती राजेश्वरी, शिवन्न कुमार, राम निगम,उत्तम कांबळे यांनी मंगळवारी मूर्तीची पाहणी केली.
Virat Kohli: विराटने व्यक्त केली भावना; द्रविडला म्हणाला, माझ्याच चुकांनी अपयशी ठरलो अन्… यासंदर्भात केंद्रीय पुरातत्त्व विभाग लवकरच अहवाल सादर करणार असून या अहवालानंतर संवर्धन संदर्भात पुढील निर्णय होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. दरम्यान पाहणी नंतर सध्या स्थितीत मूर्ति सुरक्षित असून काही प्रमाणात संवर्धनाची गरज भासल्यास त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातील, अशी माहितीही केंद्रीय पुरातत्त्व विभागाने दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.