जळगाव : घरात आंघोळ करताना १३ वर्षीय मुलाला हिटरचा शॉक लागला. मुलाचा आरडाओरडा ऐकून धावून आलेल्या शेजारच्या १२ वर्षीय मुलीने धाडस दाखविले आणि वीजपुरवठा बंद करत मुलाचे प्राण वाचविले आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील संजय गांधी नगरात मंगळवारी सकाळी ही थरारक घटना घडली.

सागर सपकाळे (वय १३ वर्ष) असे प्राण वाचलेल्या मुलाचे नाव आहे. तर त्याच्यासाठी देवदूत ठरलेल्या मुलीचे नाव सिद्धी गायके (वय १२ वर्ष) असे आहे. सिद्धी हिने दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चाळीसगाव शहरातील संजय गांधी नगरात सागर सपकाळे हा त्याची आई व आजी यांच्यासोबत राहतो. तो आठवीत शिक्षण घेत आहे. सागरची आई धुणीभांडी तसेच मजुरी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवते. त्यानुसार सागरची आई मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामासाठी निघून गेली. तर आजी सुद्धा शेजारी गेल्या होत्या.

यादरम्यान सागर हा आंघोळीसाठी गेला. हिटर लावलेले पाणी घेत असताना त्याला अचानक विजेचा धक्का बसला. सागरने जोरजोरात आरडाओरडा केला. हा आवाज सागरच्या शेजारी राहत असलेल्या सिद्धी गायके या मुलीच्या कानी पडला व ती आवाजाच्या दिशेने धावत सुटली.

विजेचा धक्का बसल्यावर काय उपाययोजना करावयाचे याचे धडे सिद्धी हिला शाळेत मिळाले होते. त्यानुसार प्रसंवधान राखत सिध्दी हिने तात्काळ धाडस दाखवत घरात प्रवेश केला. सागरला ज्या ठिकाणी विजेचा धक्का लागला होता, तेथे जाऊन सर्वप्रथम त्याठिकाणचा वीजपुरवठा बंद केला.

बाईक थांबवून फोनवर बोलत होते, पण मागून ट्रॅक्टरने उडवून चिरडलं, पुण्यात शिक्षकाचा करुण अंत

जीवाची पर्वा न करता घरात शिरली, अन् केला वीजपुरवठा बंद

सागरच्या आवाजाने इतरांनीही घटनास्थळी धाव घेत गर्दी केली होती. शॉक लागल्याच्या घटनेने सागर प्रचंड घाबरलेला होता. वीजपुरवठा बंद केल्यावर सागर जमिनीवर कोसळला. त्याला तत्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सागरजवळ पोहचविण्यास अजून थोडा उशीर झाला असता, कदाचित दुर्घटना घडली असती, मात्र सिद्धी हिने कुठलीही वेळ न वाया घालवता, प्रसंगावधान राखत धाडस दाखविले व त्यामुळेच सागरचे प्राण वाचले.

तुझ्या बायकोला झोपायला पाठव, शेजाऱ्याची घाणेरडी मागणी, तरुणाने जीव घेतला, मग…
सिद्धी ही सातवीला शिक्षण घेत आहे. कुणाला शॉक लागल्यानंतर काय करावयाचे, याबाबत शाळेत शिक्षकांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिकवले होते, ते तिच्या लक्षात होते. त्यामुळे तिने हिमतीने घरात प्रवेश केला, आणि संपूर्ण घराला ज्या ठिकाणाहून वीजपुरवठा होता, तो वीजपुरवठा बंद करत सागरचे प्राण वाचविल्याचे सिद्धी गायके हिने सांगितले. सिद्धीने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, दाखविलेले प्रसंगवधान व धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

ऊसतोड कामगाराच्या ५ वर्षांच्या लेकरानं अखेर बोअरवेलमध्येच जीव सोडला; एनडीआरएफचे आठ तासांचे प्रयत्न निष्फळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here